हुश्श…! राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता ,कमाल तापमानात चढ-उतार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी ढगळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वावरतील तूर तसेच रब्बीच्या कांदा , गहू , हरभरा या पिकांना ढगाळ वातावरणामुळे धोका संभवत होता. आता हवामान विभागाने पाऊस उघडीप देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यात थंडी गायब झाली असून उकड्यासह कमाल तापमानात चढ-उतार होतो आहे. आजपासून म्हणजेच दिनांक 24 पासून राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. मंगळवारी दिनांक 23 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील राहुरी इथं 50 मिलिमीटर, सोलापुरात 20 मिलिमीटर, माढा आणि शिरपूर मध्ये प्रत्येकी दहा मिलिमीटर पाऊस पडला. तर मराठवाड्यातील जाफराबाद इथं 30 मिलिमीटर, बदनापूर, निलंगा, जिंतूर येथे प्रत्येकी दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागलाय आत दक्षिण बंगालच्या उपसागरात मध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आज दिनांक 24 रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनार्‍याकडे येण्याचे संकेत आहेत.

दरम्यान राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. मंगळवारी दिनांक 23 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून महाबळेश्वर 17.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतही तापमानाचा पारा वाढू लागला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!