अशी ओळखा युरिया ,डीएपी खतामधील भेसळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात पेरण्या देखील झाल्या आहेत. मात्र पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेकदा शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणे आणि खतांचा सामना करावा लागतो. अशावेळी भेसळयुक्त खत कसे ओळखावे याबाबत आजच्या लेखात माहिती घेऊया.

खतांमधील भेसळ खालील प्रमाणे ओळखता येते

–युरिया :1:5 या प्रमाणात युरिया आणि पाणी काचेच्या ग्लास मध्ये घ्यावे.
–पूर्णपणे युरिया विरघळून घ्यावा.
–शुद्ध युरिया पूर्णपणे विरघळतो आणि ग्लास हातात स्पर्श केल्यास थंड लागतो.
–परंतु न विरघळलेला पदार्थ खाली राहिल्यास त्यात भेसळ आहे असे समजावे.
— तसेच एका चमच्यात युरियाचे दाणे घेऊन त्याला उष्णता दिल्यावर ते दाणे वितळले तर युरिया शुद्ध आहे असा निकष काढता येतो.
–डीएपी हातावर घेऊन त्यात खाण्याचा चुना टाकून तंबाकू मळतो तसा मळल्यावर उद्या अंड्या सारखा वास येतो. असा वास आल्यास डीएपी चा दर्जा उत्तम आहे असे समजावे.

Leave a Comment

error: Content is protected !!