फळबागायतदारांना आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर निर्यातीकडे लक्ष द्या : नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भात फळबागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यातुलनेत उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. यामध्ये अनेक घटक जबाबदार आहेत. फळबागांचे उत्पन्न हे लाखोंच्या घरात असल्याने फळांच्या दर्जाकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जीवनात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर ज्या फळांची निर्यात अधिक प्रमाणात होते त्याचीच लागवड करणे आवश्यक आहे. याकरिता रोपवाटिका व्यवस्थापन सुधारुन नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचे याचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फळबागायत शेतकऱ्यांना केले आहे.

फळांच्या निर्यातीकडे लक्ष देण्याचा सल्ला

फळबागायत उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भात फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे केवळ उत्पन्नाकडे लक्ष दिले जाते तर उत्पादनाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. फळबागांसाठी पोषक वातावरण हीच मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे हंगामी पिके घेणाऱ्यांपेक्षा येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही चांगली आहे. मात्र, यावरच समाधान न मानता येथील फळांची निर्यात कशी होईल यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला आहे.

शेतकऱ्यांनी फळांचा दर्जा राखण्यात सातत्य ठेवले पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड न केल्यास हंगामात स्थानिकस्तरावर दर कमी असतील अशावेळी देशाच्या इतर राज्यात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करून जादा दर मिळविणे शक्‍य होणार असल्याचे सांगत फळांचे निर्यात वाढवण्याचा सल्ला गडकरींनी शेतकऱ्यांना दिला आहे.

फळबागा अंतिम टप्प्यात असल्यावर फळगळती तसेच इतर संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उत्पादन क्षेत्र वाढविण्यापेक्षा कमी क्षेत्रावरीलच बाग चांगल्या पध्दतीने जोपासल्यास उत्पन्न मिळणार आहे. शिवाय किडीचा प्रादुर्भाव झाला तरी क्षेत्र कमी असल्याने नुकसान टाळता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागांच्या दर्जावर भर देणे आवश्यक असल्याचे मत पंजाबराव कृषी विद्यापीठाते माजी कुलगुरु डॅा. सी. डी माळी यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!