दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन किंवा जलमार्ग बांधायचा असल्यास ,काय आहे कायदेशीर मार्ग ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बऱ्याचदा शेतकऱ्यांना आपल्या जमिनीमध्ये जलसिंचन करण्यासाठी पाणीपुरवठा करून घेण्यासाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीचा वापर करावा लागतो. अशा जमीन मालकाची अशा रीतीने पाणीपुरवठा करून घेण्यास हरकत असेल तर शेतकऱ्याला फार मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागते. १९६७ कलम 49 मधील उपनिबंधकांनी या अडचणी दूर केल्या आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी कायदेशीररित्या कशा पद्धतीने दुसऱ्याच्या शेतातून किंवा मालकी हक्काच्या जमिनीतून पाईपलाईन किंवा संबंधित जलमार्ग बांधून घेऊ शकतो याची माहिती घेउया …

आता यामध्ये जलमार्ग बांधू इच्छिणाऱ्या व्यक्तीला ‘अर्जदार’ असे म्हणतात तर ज्याच्या जमिनीमधून जलमार्ग बांधायचा आहे अशा व्यक्तीला ‘शेजारील धारक’ असं म्हणतात. अर्जदार जिथून पाणी घेण्याची त्याला परवानगी आहे अशा शासनाच्या मागच्या विहिरी तलाव नदीचे पात्र किंवा इतर कोणतेही पायाचे साधन सारख्या जिथून त्याला पाणी घेण्याचा हक्क आहे अशा पाण्याच्या साधनांपासून स्वतःच्या जमिनीवर सिंचन करण्यासाठी पाणी घेण्याचा जलमार्ग बांधू इच्छित असल्यास आणि शेजारील धारक असा जलमार्ग बांधण्याची परवानगी त्याला देत नसल्यास अशी परवानगी दिली जावी यासाठी तहसीलदाराकडे अर्ज करायचा असतो.

तहसीलदाराने अर्ज मिळाल्यावर शेजारील धारकाला तसच जिच्या मधून जलमार्ग बांधावयाचा आहे त्या जमिनीमध्ये हितसंबंध असणाऱ्या इतर व्यक्तींना नोटीस द्यावयाची असते संबंधित पक्षांकडून काही आक्षेप असल्यास तहसीलदारांना ते ऐकून घेऊन त्या संबंधीत आवश्‍यक ती चौकशी करायची असते.

अर्जदाराच्या मालकीच्या जमिनीच्या शेतीसाठी संपूर्णपणे व कार्यक्षमरीत्या वापर होण्याकरिता जलमार्ग बांधण्याची आवश्यकता असल्याची तहसीलदाराची खात्री पटल्यास तहसीलदारांना खालील दिलेल्या अटींवर जलमार्ग बांधण्यात अर्जदाराला परवानगी देण्यासाठी शेजारील धारकाला निर्देशीत करणारा लेखी आदेश द्यावा.

1) पक्षकारांनी केलेल्या करारात नमूद केलेल्या नदीचे नाव व पद्धतीने किंवा करार झालेला नसल्यास तहसीलदारांना निर्देशित केल्याप्रमाणे ज्यामधून जलमार्ग बांधायचा आहे त्या जमिनीला शक्यतो कमी नुकसान पोहोचावे अशा रीतीने जलमार्ग बांधावा.

2) जेव्हा जमिनीवर किंवा जमिनीखालून जलमार्ग टाकून जलमार्ग तयार करायचा असतो तेव्हा अशा जमिनीतील कमीत कमी अंतर व्यापून तो आखावा याच वेळी शेजारील धारकाच्या जमिनीसंबंधीची सर्व परिस्थिती लक्षात घ्यावी. जमिनीखालून जलमार्ग घालावयाचे असतील तेव्हा ते जमिनीच्या भूपृष्ठापासून 0.5 मीटर पेक्षा कमी नाही इतक्या खोलीवर टाकण्यात यावेत.

3) पाण्याचा कालवा काढून असा जलमार्ग तयार करावयाचा असेल तेव्हा कालव्याची रुंदी पाणी वाहून नेण्यासाठी खरोखरच आवश्यक असेल त्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत 1.5 मीटरपेक्षा अधिक असू नये.

4) अर्जदाराने शेजारील धारकाला पुढीलप्रमाणे रक्कम द्यावी.

* जलमार्ग बांधल्यामुळे अशा जमिनीवर हानीकारक परिणाम झाल्यामुळे त्या जमिनीचे जे काही नुकसान झाले असेल त्याबद्दलची नुकसान भरपाई.
* जेव्हा जमिनीवरून पाण्याचे कालवे किंवा जलमार्ग नेलेले असतील तेव्हा तहसीलदार ठरवतील तितके वार्षिक भाडे आणि जमिनीखालून जलमार्ग टाकले असल्यास अशा भूमिगत जलमार्ग टाकलेल्या संपूर्ण पट्ट्याचे भाडे म्हणजेच दरमहा मीटर मागे किंवा त्याच्या काही भागाप्रमाणे पंचवीस पैसे याप्रमाणे वार्षिक भाडे.

5) अर्जदाराने जलमार्ग योग्य रीतीने दुरुस्त करून तो सुस्थितीत ठेवावा.

6) जलमार्ग जमिनीखालून टाकलेला असल्यास अर्जदाराने
* जमिनीखालून असे जलमार्ग टाकने व्यवहार्य ठरेल इतपत कमीत कमी वेळ द्यावा.
* भूमिगत जलमार्ग टाकण्याकरिता वाजवी रित्या आवश्यक असेल त्यापेक्षा अधिक जमीन खोदून नये आणि अशा तऱ्हेने खोदलेली जमीन अर्जदारांना स्वखर्चानं माती टाकून पूर्ववत व शेजारील धारकाला वापरता येईल अशी करून द्यावी.

7) अर्जदाराला जलमार्ग टाकावयाचे असतील किंवा दुरूस्त करावयाचे अथवा नवीन टाकावयाचे असतील तर त्याने तसे करण्याचा आपला विचार असल्याची पुरेशी नोटीस शेजारील धारकाला दिल्यानंतर जल मार्गाचे काम सुरू करावे व तसे करताना जमिनीला किंवा जमिनीवरील उभ्या पिकाला शक्यतो कमी नुकसान पोहोचेल याची खबरदारी घ्यावी.

अर्जाचा नमुना – https://drive.google.com/file/d/1hV1mpOy7BFnioQvdcq-eNjhF16rykaaV/preview

Leave a Comment

error: Content is protected !!