IFFCOचे पुढचे पाऊल, आता नॅनो युरिया चे प्लांट अर्जेंटिना मध्ये सुद्धा उभारणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी इफकोनं (इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड) नॅनो युरिया लाँच केला आहे, त्यांच्या ५० व्या वार्षिक बैठकीत हे लाँच करण्यात आले. सध्या देशामध्ये नॅनो युरिया शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जसे की काही दिवसांपूर्वी नॅनो युरिया चा पहिला ट्रक महाराष्ट्र मध्ये पाठवला गेला. इफोकनं नॅनो युरिया च्या माध्यमातून जागतिक पातळीवर डंका लावला आहे अशी माहिती इफकोचे प्रमुख निर्देशक डॉ. उदय शंकर अवस्थी यांनी दिली आहे.

इफको ब्राझील, अर्जेंटिनामध्ये प्लांट लावणार 

आंतरराष्ट्रीय पातळीवर इफकोनं ब्राझील, अर्जेंटिना व इतर देशात नॅनो युरियाच्या उत्पादनासाठी युनिट निर्मित करणार आहेत तसेच फिलीपाईन्स, इंडोनेशिया, मलेशिया आणि दक्षिण कोरिया सोबत चर्चा चालू आहे असे डॉ. उदय शंकर अवस्थी यांनी दिली. भारत देश हा आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचा सदस्य आहे.

नॅनो यूरीया नेमका काय?

युरियाच्या ५० किलो बॅगेमध्ये जेवढी पोषक तत्वे असतात तेवढी नॅनो युरिया मध्ये असतात कारण नॅनो युरियाच्या ५०० मिलीमध्ये ४० हजार पीपीएम नायट्रोजन असतो. नॅनो युरिया हा पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवला आहे, नॅनो युरिया ची निर्मिती कलोल येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्थेने केले आहे. मंगळवार पासून शेतकऱ्यांना नॅनो युरिया भेटणार आहे जसे की ५०० मिली ची बॉटल २४० रुपये ला भेटणार आहे. शेतकऱ्यांना नॅनो युरिया कसा वापरायचा याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!