IFFCOने बनवले ‘ सागरिका ‘ सेंद्रिय खत, शेतकऱ्यांना होणार फायदा; जणून घ्या किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना तोट्याला सामोरे जावे लागू नये, यासाठी शासन शेतकर्‍याच्या विकासावर भर देत आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्याबरोबरच पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी नेहमीच प्रयत्नशील असतात. आता अशा परिस्थितीत त्यांनी सेंद्रिय खताचा वापर केल्यास त्यांचे पीक चांगले येईल आणि नफाही जास्त होईल.

काय आहे सागरिका सेंद्रिय खत

इफकोने असे सेंद्रिय खत तयार केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन आणि मातीची गुणवत्ता दोन्ही वाढवता येईल. हे सेंद्रिय खत समुद्री शैवालपासून तयार केले जाते, म्हणून याला सागरिका सेंद्रिय खत असे नाव देण्यात आले आहे.

सागरिका सेंद्रिय खताची किंमत

शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता आणि पिकाच्या गुणवत्तेची चिंता असते, त्यामुळे इफकोने 2 वर्षे संशोधन करून सागरिका तयार केली आहे. विशेष बाब म्हणजे सागरिका हे १००% सेंद्रिय खत आहे. शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सागरिका द्रव आणि घन अशा दोन्ही स्वरूपात बाजारात आणली आहे. इफको नुसार 1 लिटर द्रव बाटलीची किंमत 500 रुपये आहे आणि घन स्वरूपात 10 किलो सेंद्रिय खताची किंमत 415 रुपये आहे.

सागरिका सेंद्रिय खताचा वापर

इफकोने जमिनीची सुपीकता आणि पिकाची गुणवत्ता लक्षात घेऊन या सेंद्रिय खताचा वापर सोपा केला आहे. 250 मिली द्रव सागरिका सेंद्रिय खत एक लिटर पाण्यात विरघळवून तुम्ही संपूर्ण एक एकर शेतात फवारणी करू शकता. दुसरीकडे, जर आपण घन सागरिकाबद्दल बोललो, तर एक एकर जमिनीवर 8 किलोपर्यंत वापरले जाऊ शकते.

कंदयुक्त भाज्यांसाठी उपयुक्त

भाजीपाला पिकांवर सागरिका सेंद्रिय खताची फवारणी केल्यास शेतकऱ्यांना सर्वाधिक पीक मिळेल. कांदा, आर्बी, बटाटा, लसूण इत्यादी कंदयुक्त भाज्यांसाठी या सेंद्रिय खताचा वापर करून शेतकरी मोठा नफा कमवू शकतात.सागरिका हे सेंद्रिय खत बनवणाऱ्या ऍक्वाग्रीचे व्यवस्थापकीय संचालक अभिराम सेठ यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही शैवालपासून कॉस्मेटिक आणि इतर गोष्टींमध्ये वापरण्यात येणारी उत्पादने तयार करायचो. ती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर आहे. त्यानंतर शैवालपासून सागरिका बनवण्याचे काम सुरू झाले. .”

सागरीकाच्या किमती खालीलप्रमाणे :

Sagarika Liquid (Packing Size) –MRP (Rs./Unit)(inclusive taxes)
100 ml –70.00
250 mll– 135.00
500 ml –260.00
1 Litre –500.00

Sagarika Granules   –MRP (Rs./Unit )(inclusive taxes)

10 Kg Bag –415.00
10 Kg Bucket –515.00
25 Kg Bag– 960.00

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!