राज्यात जोमाने परतणार पाऊस, ‘या’ भागात ‘ऑरेंज अलर्ट’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा राज्यात सक्रिय होणार आहे. कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. हवामान खात्यानं कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ऑरेंन्ज अलर्ट जारी केला आहे. 11 जुलैपासून म्हणजेच उद्या पासून तीन दिवस वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

9 ते 13 जुलै या दरम्यान संपूर्ण राज्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही 12 ते 13 जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे.

बंगालचा उपसागर आणि ओडिशा, पश्चिम बंगालच्या समुद्र किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागात रखडलेला मोसमी पाऊस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा सक्रिय होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!