पुढील २-३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, कोकण आणि मध्यमहाराष्ट्राला अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :  कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. काही लोकांच्या घरांमध्ये पाणी साठले आहे. अशा परिस्थितीत आणखी दोन-तीन दिवस हवामान खात्याने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने 22 – 26 जुलै पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्राला दिला आहे. यातही पुढच्या दोन-तीन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्राला अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशी माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

आज या ठिकाणी पाऊस

हवामान विभागाने आजच्या दिवसासाठी रायगड पुणे रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे तर मुंबई ठाणे पालघर नाशिक औरंगाबाद जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. उस्मानाबाद धुळे जळगाव अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्हा ना अलर्ट देण्यात आला आहे.

22 जुलै गुरुवार – संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया.
23 जुलै शुक्रवार – संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, वाशिम, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ.
24जुलै शनिवार -संपूर्ण कोकण पुणे सातारा कोल्हापूर अकोला अमरावती.
25जुलै रविवार – ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर.

विदर्भातही विजांसह पावसाची शक्यता

विदर्भात विजांच्या गडगडाटासह वादळासह व हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूर , वर्धा ,यवतमाळ अकोला व अमरावती जिल्ह्यात व इतर ठिकाणी बर्‍याच ठिकाणी पावसाची संभावना आहे. यात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर विदर्भातील गडचिरोली जिल्हा यांचाही समावेश आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!