महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र वाढीसाठी शरद पवारांकडून महत्वपूर्ण सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर मुबंई येथील सह्याद्री अतिथिगृहात, खासदार शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फलोत्पादन बाबत महत्वाच्या सूचना केल्या. या बैठकीबाबतची माहिती कृषिमंत्री दादा भूसे यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

शरद पवार यांनी दिलेल्या सूचना

–महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण उपलब्ध करणे, त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे.
— प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण फळपिक विकसित करुन ब्रॅन्डिंग करणे.
— फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था उभी करुन प्रत्येक जिल्ह्यात फळनिहाय शाखा निर्माण करणे.

ॲव्हाकॅडोसारख्या नवीनफळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन

राज्यातील फळे व भाजीपाला निर्यातक्षम होण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरु असून अॅपेडामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. राज्यातील फलोत्पादन क्षेत्र वाढवताना फळांना जिल्हानिहाय भौगोलिक मानांकन देण्यासाठी त्याचबरोबर ॲव्हाकॅडोसारख्या नवीनफळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अशी माहिती दादाजी भुसे यांनी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!