काळ्या गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गहू संशोधन केंद्राचा महत्वाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मधुमेहासाठी उपयुक्त तेसच खाण्यासाठी पौष्टिक म्हणून काळया गव्हाला बाजारात चांगली मागणी आहे. काळ्या गव्हाची लागवड राजस्थान, पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरीदेखील काळ्या गव्हाच्या शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी देखील गेल्या गव्हाची लागवड करताना दिसून येत आहेत. मात्र तुम्ही सुद्धा काळ्या गव्हाची लागवड करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. काळ्या गव्हाच्या गावाच्या नावाखाली शेतकर्‍यांची दिशाभूल होत असल्याचे समोर आले आहे. बियाणे कायद्यात त्या वाणाची नोंदच नाही. महाराष्ट्रात काळ्या गव्हाच्या लागवडीची शिफारस पण नसल्याचे समोर आले आहे.

भारतीय गहू संशोधन केंद्रामध्ये गव्हाचे एकूण 22 वाण नोंद करण्यात आले आहेत. 1965 च्या बियाणे कायद्याच्या राजपत्र अधिसूचनेनुसार वाणाची नोंद होणे महत्त्वाचे आहे. केंद्राने केलेल्या मूल्यांकन निकषात काळा गहू हा वाण सरस ठरलेला नाही, अशी माहिती गहू संशोधन केंद्र, कुंदेवाडीचे अधीक्षक सुरेश दोडके यांनी दिली. काळ्या गव्हाची उत्पादकता इतर वाणांच्या तुलनेत कमी आहे. इतर गहू वाणांच्या तुलनेत प्रथिने , लोह, जस्त यांची उपलब्धता अधिक आहे. इतर वाणांच्या तुलनेत रोगप्रतिकारक नाही. उत्पादनपश्चात विक्रीकरीता अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, असं गहू संशोधन केंद्राकडून जाहीर करण्यात आले आहे.

राष्टीय स्तरावरून शिफारस नसताना लागवड

अव्वाच्या सव्वा दराने काळ्या गव्हाचे बियाणे विक्रीचा काळाबाजार सुरू आहे. तर काही शेतकरी अधिक दराच्या लोभात काळ्या गव्हाची लागवड करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, भारतीय गहू संशोधन संस्थेत गहू पिकाचे 22 वाण नोंदणीकृत आहेत. नोंदणीकृत 22 गहू वाणांच्या तुलनेत काळ्या गव्हात पोषकतत्वे ,रोगप्रतिकारकता व उत्पादकता कमी दिसून आले आहे. काळ्या गव्हाच्या वाणासंबंधी राष्ट्रीय स्तरावरून शिफारस नसताना लागवडी केल्या जात असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राकडे शहानिशा केली असता त्यांनी काळ्या गव्हाबद्दल माहिती दिली.

 

Leave a Comment

error: Content is protected !!