केवळ आश्वासनं…! आक्रमक शेतकऱ्यांनी विमा कार्यालयाचे कामकाज पाडले बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरेतर नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार द्यावी ही अट शासनाने घातली आहे. मग वेळेआधी ऑफलाईन ,ऑनलाईन अशी मोठी खटपट करून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या खऱ्या. मात्र तीन महिने उलटले तरी परताव्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अखेर आक्रमक होत लातुरात शेतकऱ्यांनी विमा कार्यालयाचे कामकाज बंद पाडले.

विमा कंपन्यांकडून केवळ आश्वासनेच…

मागील वर्षी अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या जमिनी वाहून गेल्या, पिकांचे अतोनात नुकसान झाले. मोठी खटाटोप करून शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांची वाट धरून नियमांची पूर्तता केली मात्र लातूरसह राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना अद्यापही विम्याचा परतावा मिळाला नाही. विमा कंपनीकडून केवळ आश्वसनच दिले गेले. शेवटी आक्रमक होत लातुरात शेतकऱ्यांनी विमा कार्यालयाचे काम बंद पाडले. केवळ लातूरच नव्हे तर लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास ८४ हजार शेतकरी हे विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. यापूर्वी उस्मानाबाद येथे देखील शेतकीऱ्यांनी विम्याच्या रकमेसाठी आंदोलन केले होते. मात्र अद्यापही त्यावर काही कार्यवाही होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना मात्र आपल्या हक्काच्या रकमेसाठी झगडावे लागत आहे.

लातुरात गतवर्षी अतिवृष्टीमुळे मांजरा नदीकाठच्या शेतजमिनी ह्या खरडून वाहून गेल्या. होत्या त्या दरम्यान, पाहणी होताच नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र, आता रब्बी हंगामातील पेरण्या झाली तरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणती भरपाई मिळालेली नाही. हे सर्व प्रश्न घेऊन शेतकऱ्यांनी विमा कंपनीचे कामकाजच बंद पाडले. खरीप हंगामातील पीकविमा नुकसान होऊन पाच महिन्याचा कालावधी लोटला तरी मदतीची प्रक्रियाही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे विमा कंपन्यांचा कारभार असाच राहिला तर शेतकरी हे आक्रमक होतील आणि विमा प्रतिनीधींना काम करणे मुश्किल होईल असे भाकीत कृषी विभागाने केले होते, ते अखेर सत्यात उतरले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!