राज्यातील अनेक जिल्ह्यात दिवसाचे तापमान तीस अंशांच्यावर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान तिशीच्या वर गेले आहे सोलापूर येथे उच्चांकी 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होऊ लागली आहे आज दिनांक 4 रोजी किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तर भारतात गारपिटीसह पावसाची शक्यता

दरम्यान आज दिनांक चार रोजी वायव्य आणि उत्तर भारतात वीज आणि गारपीटही पावसाची शक्यता आहे. तर हिमालय पर्वत आणि लगतच्या परिसरावर हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली असून धुळे येथील कृषी महाविद्यालयात गुरुवारी दिनांक 3 रोजी ते सहा अंश सेल्सियस, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान दहा अंशांच्या पुढे गेले आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान 32 अंशांच्या पुढे गेले असून सोलापूर, पुणे, धुळे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, अकोला, वाशीम, यवतमाळ येथे 30 अंश हुन अधिक तापमान आहे. दिवसा कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानात 13 ते 27 अंश यांची तफावत दिसून येत आहे.

हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे 35 अंश सेल्सिअस, परभणी येथे 30.2, कोल्हापूर येथे 31.4 ,सातारा 1.6 ,कुलाबा 29.6, सांताक्रुज 31.1, पुणे 31.1, नांदेड 30.2 आणि सांगली इथं 34.3 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!