नाशकात लाल कांद्याच्या दराने केले सीमोल्लंघन… क्विंटलमागे मिळाला 5151 रुपयांचा सर्वाधिक भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या पावसामुळे कांद्याच्या पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे मात्र कांडा उत्पादक शेतकऱ्यांना साठवणीच्या कांद्याने चांगलाच भाव मिळवून दिला आहे. नाशिक येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याला क्विंटलमागे तब्बल ५१५१ रुपयांचा भाव मिळला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकरी रणजित देवरे यांनी आणलेल्या लाल कांद्याला क्विंटलमागे सर्वोच्च 5151 रुपये भाव मिळला आहे. यावेळी शेतकरी देवरे यांचा सत्कारही करणयात आला. सध्या मराणे बाजार समितीमध्ये या कांद्याची जवळपास एक हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे. त्यात सर्वात जास्त भाव हा 5151 मिळाला असून, सर्वात कमी भाव 1100 रुपये इतका मिळाला आहे. तर सरासरी 2700 रुपयांनी कांद्याची विक्री झाल्याचे समजते.या कार्यक्रमाला बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफणा यांच्यासह कांदा व्यापारी उपस्थित होते.

कांद्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता

अजून महिनाभर तरी लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे या कांद्याचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे या वर्षी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. त्याचा फटका लाल कांद्यालाही बसला. त्यामुळे बाजारात या कांद्याची आवक तशीही कमी आहे. सध्या उ नाशिक जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे यंदा इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा फटका कांद्यालाही बसला आहे. खरिपासह या भागातील फळबागांचे नुकसान झाले आहे. मात्र, सध्या तरी लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हासू आले आहे.

साठवणुकीचा फायदा

योग्य दर मिळला नाही, तर शेतकरी कांद्याची साठवणूक कांदा चाळीत करून ठेवतात. नाशिकसह राज्यातील उत्पादकांना कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. दरवर्षी अगोदर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथील लाल कांदा बाजारात येतो. आणि याच कांद्याला अधिकचा दरही मिळतो. यंदा मात्र, पावसामुळे या राज्यातील कांदा नाशिकच्या बाजारात दाखल होऊ शकला नाही. त्याचाच फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा बाजारात आणल्याने त्यांना वाढीव दर मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!