पंढरपुरात ६० किलो टोमॅटोला अवघा १५ रुपये दर ; शेतकरी हवालदिल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलते वातावरण कोरोना या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशातच मोठ्या कष्टाने घेतलेल्या उप्तादनाला कवडीमोल दर मिळाल्याने शेतकरी पुन्हा एकदा डबघाईल आला आहे. नुकतेच पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये याचा प्रत्यय आला आहे.
एका शेतकऱ्याला टोमॅटोकरिता चक्क १५ रुपये इतका कमी दर मिळाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज टोमॅटोला कवडी मोल दर मिळाला आहे. हे ऐकून आपणाला खरं वाटणार नाही परंतु हे सत्य आहे. चक्क 60 किलो टोमॅटोला‌ फक्त 15 रुपयांचा दर मिळाला आहे. एका शेतकऱ्याने आपली तीन क्रेट टोमॅटोची विक्री साठी आणली होती. त्याला फक्त पंधरा रुपये मिळाले आहेत. कोरोनामुळे आधीच शेतीमालाचे भाव गडगडले आहेत. अशातच आता भाजीपाल्याचे दर ही पार भुईसपाट झाले आहेत.पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज भाजीपाल्याचे लिलाव झाले या लिलावामध्ये चक्क साठ किलो टोमॅटोला फक्त पंधरा रुपयांचा दर मिळाला आहे. या शेतकऱ्याचा पीक घेण्यासाठी आलेला खर्चही निघाला नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!