पुढील 48 तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील थंडीत आणखीनच वाढ झाली आहे रविवार दिनांक 19 रोजी राजस्थानच्या चुरू इथे देशातल्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी 2.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली या राज्यातही गारठा वाढला असून निफाड येथे किमान तापमान 10 अंश यावर गेल्या आज दिनांक 22 रोजी थंडी आणखी वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हिमालयातील हिमवृष्टीचा परिणाम
हिमालयात होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची तीव्रता होत आहे. वायव्येकडून वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या हवामानामुळे पंजाब हरियाणा चंदिगड राजस्थान राज्यांमध्ये थंडीची लाट तीव्र होत असून या भागात थंड दिवस अनुभवायला मिळत आहेत. मंगळवार पर्यंत किमान तापमानात आणखी घट होणार आहे.विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका आणखी वाढणार यात उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात किमान तापमानात घट होऊ लागली आहे. बहुतांशी कमाल तापमान 29 अंश यापेक्षाही खाली आले असून त्यात चढ-उतार होत आहेत रविवारी 19 सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरीत सर्वाधिक 32. ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

 

या भागात मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान आग्नेय बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही प्रणाली पूर्व आणि ईशान्य दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदमान निकोबार बेट समुदायावर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

21 फेब्रुवारीपर्यंत राज्यात तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता
21 फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर आताच 8 ते 9 अंशांपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर ऊबदार कपडेही कपाटाबाहेर काढून वापरात आलेत. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील 48 तासात थंडीचा जोर वाढणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!