पांढरं सोनं लखलखलं … ‘या’ बाजारसमितीत कापसाला मिळला 10 हजार भाव ; जाणून घ्या आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यापासून कापसाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा भाव ९ हजारांच्या वर जाऊन त्याने १० हजारांचा टप्पा गाठला आहे. काल ३-१-२२ रोजी अकोला जिल्ह्यातल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल १० हजार इतका भाव मिळाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अकोला जिल्ह्यातल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नितीन गुलाबराव कोकाटे या शेतकऱ्याच्या कापसाला १० हजार प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चांगल्या प्रतीच्या कापसाला चांगला भाव बाजारात मिळतो आहे. खरतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र अद्यापही म्हणावा तसा दर सोयाबीनला मिळत नाहीये. कापसाला मात्र चांगला दर सध्या शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे नववर्ष कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंद घेऊन आले आहे असे म्हणायला हरकत नाही.

आजही कापसाला १० हजारांचा दर

आजचे कापुस बाजार भाव पाहता कापसाच्या दराने दहा हजार प्रति क्विंटलचा आकडा गाठला आहे. आज प्राप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार पुलगाव इथं मध्यम स्टेपल या कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 2675 क्विंटल कापसाची आवक झाली या कापसाला कमीत कमी भाव ८६००रुपये, जास्तीत जास्त भाव १०,००० तर सर्वसाधारण दर हा ९७०० रुपये इतका मिळाला आहे. याच बरोबर इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भाव पाहता हे जास्तीत जास्त 9 ते आठ हजारांच्या आसपास असलेले आहेत त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळतो आहे.

राज्यात कोणत्या बाजार समितीत कापसाला किती भाव मिळाला याची माहिती आम्ही खाली देत आहोत. आपला कापूस विक्री करताना योग्य भाव तपासून कापूस विक्री करा तसेच खालील बाजार भाव पाहताना काही समस्या येत असल्यास उजव्याबाजूला स्क्रोल करा.

आजचा 04/01/2022 कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/01/2022
अमरावतीक्विंटल115950098009650
हिंगोलीक्विंटल20900094009200
आष्टी- कारंजाक्विंटल210930096009550
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल316960097009650
अकोलालोकलक्विंटल58920092259212
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल230855099999595
देउळगाव राजालोकलक्विंटल3000955098359750
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल26758600100009700

Leave a Comment

error: Content is protected !!