लासलगाव मार्केट यार्डात कांद्याच्या भावात वाढ ; जाणून घ्या दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. महाराष्ट्रासह आसापासच्या राज्यांमधून देखील येथे विक्रीसाठी माल आणला जातो. आज दुपारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला १२०० रुपये किमान तर ३६७० रुपये कमाल भाव मिळाला तर सर्वसाधारण दर हा क्विंटल मागे ३३५० इतका आहे. मागील दोन दिवसात कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

कांद्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 7 ऑक्टोबर रोजी 12,987 क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. यावेळी किमान दर हा 1100 तर कमाल दर हा 3551 आणि सर्वसाधारण तर हा 3250 इतका होता. त्याच्या तुलनेत आज दिनांक 9 रोजी उन्हाळी कांद्याची आवक ही एकूण पाच हजार 880 क्विंटल इतकी झाली आहे . तर किमान दर हा १२०० रुपये असून कमाल दर हा 3670 रुपये तर सर्वसाधारण दर हा 3350 इतका आहे. मागील दोन दिवसातील दरांचा विचार करिता सर्वसाधारण दरामध्ये शंभर रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पावसामुळे शेतीमालाला फटका

राज्यातल्या बऱ्याच भागात पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका कांदा पिकालाही बसला आहे. मागील २-३ दिवसात बाजार समित्यांमध्ये कांद्याची चांगली अवाक होताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांकडून फेब्रुवारीच्या चाळीतला कांदा देखील विक्रीस आणल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!