राज्याच्या कमाल तापमानात वाढ ; सोलापुरात पारा 35 अंशांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान दहा अंशांच्या पुढे गेला आहे. तर उन्हाचा चटका वाढणार सोलापूर इथं पारा हा 35 अंशांवर पोहोचले आहे. आज दिनांक 3 रोजी कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान तज्ञ के. एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन फेब्रुवारीला सोलापुरात कमाल ३५.४, कोल्हापूर ३३.३ ,पुणे ३३.६,नाशिक ३२.१ , नांदेड येथे ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

देशाच्या या भागात पावसाची शक्यता

वायव्य आणि उत्तर भारतात विजा गारपीटही पावसाची शक्यता आहे. तर हिमालय पर्वत आणि लगतच्या परिसरावर हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. बुधवारी दिनांक 22 रोजी पंजाबमधील अमृतसर व राजस्थानमधील सीकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यातच उत्तर अरबी समुद्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कुठे किती तापमान ?
राज्याचा विचार करता राज्यांमध्ये गारठा असला तरीही किमान तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी निफाड येथे गहू संशोधन केंद्रात 6.8 अंश सेल्सिअस परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 8.2, धुळे येथील कृषी महाविद्यालयात 8.8, जळगाव येथे 9.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान 32 अंश यांच्यापुढे केले असून सोलापूर येथे चोवीस तासातील उच्चांकी 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे दिवसाच्या कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानात बारा ते पंचवीस अंशांची तफावत दिसून येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!