लाल मिरचीच्या दराचा ठसका …! आगामी दोन महिन्यात आणखी भाव वाढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळयात मसाला किंवा चटणी बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु असते. यंदाच्या वर्षी मसाला बनवण्याचे गृहिणींचे बजेट कोलमडणार असून अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण लाल मिरचीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय तेल आणि इतर मसाल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे.

आवक कमी झाल्याने दरवाढ…

अवकाळी पावसाळ्याचा फटका इतर पिकांप्रमाणे मिरचीला सुद्धा बसला होता. त्यामुळे जानेवारी महिन्यात निघणाऱ्या मिरचीची आवक घटली. त्यांनतर बाजारात सतत मिरचीची हवी तशी आवक पाहायला मिळाली नाही. त्यामुळे त्याचे परिणाम आता जाणवू लागले असून, लाल मिरचीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. ही वाढ अजून तरी पुढील दोन महिने सहन करावी लागणार आहे. राज्यातल्या अनेक भागात मिरचीचे यावर्षी उप्तन्न घटल्याचे पाहायला मिळाल्याने, आवक सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे आता कर्नाटक,मध्य प्रदेश, तेलंगणसह आदी राज्यांतून मिरची आयात करावी लागत आहे. किलोमागे 20-30 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. तर मिरचीचे भाव वाढल्याने पावडरचे दर सुद्धा वाढले आहेत.

किती आहे दर ?

— सद्या लाल मिरचीचे दर 20 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. तर आगामी दोन महिन्यात हे दर 200 ते 650 किलोंपर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
–जानेवारी महिन्यापासून हिरव्या मिरचीचे उत्पादन घटल्याने लाल मिरचीच्या दरात वाढ झाली आहे.
–गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारपेठत मिरचीची आवक कमी झाली असल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे.
— सद्या बाजारात बेडगी मिरची 450 ते 460 रुपये प्रतिकिलो मिळत आहे.
–गुंटूर मिरची 200 ते 230 रुपये किलो, चपाटा 360 रुपये किलो
–तेजा मिरची 230 रुपये प्रतिकिलो मिळत आहे.
— तर रसगुल्ला मिरची हि सर्वाधिक महाग म्हणजेच 600 रुपये किलो मिळत असल्याचे चित्र बाजारात आहे.
–पुढील दोन महिने लाला मिरचीच्या बाजारात तेजी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

ताजे मिरची बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2022
नंदूरबारहायब्रीडक्विंटल3700070007000
सोलापूरलोकलक्विंटल4700070007000
मुंबईलोकलक्विंटल146200004000030000
नंदूरबारओलीक्विंटल4300038003400
22/05/2022
रामटेकक्विंटल1140001800016000
21/05/2022
अहमदनगरक्विंटल4729102716015035
मुंबईलोकलक्विंटल475200004000030000
20/05/2022
नंदूरबारहायब्रीडक्विंटल5166068004250
सोलापूरलोकलक्विंटल3065001650012700
मुंबईलोकलक्विंटल334200004000030000
मांढळलोकलक्विंटल19450099996800
नंदूरबारओलीक्विंटल3710088257950

Leave a Comment

error: Content is protected !!