कृषी क्षेत्रात वाढणार महिलांचा सहभाग ; राज्य कृषी मंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रामध्ये महिलांच्या सहभागाला अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यंदाचे वर्ष २०२२ हे महिला शेतकरी सन्मान म्हणून साजरे करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. याबरोबरच आता कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यतील कृषी आणि कृषी विभागाशी संलग्न असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण इथून पुढे महिला शेतकरी आणि मजूर यांना देखील दिले जाणार आहे. एका ऑनलाईन बैठकीदरम्यान दादा भुसे यांनी ही माहिती दिली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, वनमाचे संचालक उद्य पाटील तसेच कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यासंदर्भात कृषी मंत्र्यांनी याबाबत सांगितले की, आता या नव्या उपक्रमाद्वारे राज्यातील शेतकरी आणि महिलांना योजनांची, नवीन उपक्रमांची माहिती होणार आहे. याकरिता कृषी विद्यापीठांची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण संस्थांमधील सुविधा वाढवणे गरजेचे आहे. यशदाच्या धरतीवर कामे होणे गरजेचे असल्याचे मत राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले आहे.

नक्की काय होणार फायदा

–उत्पादन वाढीच्या अनुशंगाने राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.यामध्येच महिला शेतकऱ्यांना अधिकची सुट देण्यात येणार आहे.
–कृषी योजना आणि अन्नधान्य प्रक्रिया उद्योगामध्ये महिला शेतकऱ्यांसाठी 30 टक्के निधी हा राखीव ठेवला जाणार आहे.
–यामुळे महिलांना त्यांच्या हक्काचे निधी तर मिळणारच आहे पण नविन उद्योगाची उभारणी केली जाणार आहे.
–आतापर्यंत महिला शेतकरी ह्या पुरुषांच्या बरोबरीने कष्ट करीत होत्या पण आता त्यांना स्वत:चे असे व्यवसाय उभे करता येणार आहेत.
–त्यासाठी राज्यसरकार प्रोत्साहन देणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!