भारतीय जोडीने पिकवला जगातील सर्वात महाग आंबा; किंमत रु. २.7 लाख प्रति किलो, जाणून घ्या यामागची कथा

mango
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : एकदा, चेन्नईला ट्रेनमध्ये प्रवास करत असलेला एक माणूस दुसऱ्या एका माणसाला भेटला, ज्याने त्याला आंब्याचे झाड दिले आणि या झाडाची स्वत: च्या मुलासारखी काळजी घ्यायला सांगितले. त्या माणसाने सल्ल्याकडे लक्ष देऊन आंबा लावला.या आंब्याच्या जातीचे नाव मियाझाकी असे होते. एक जपानी जाती होती, जी पृथ्वीवरील सर्वात महाग आंबा आहे – रु. २.7 लाख (सुमारे 36०० अमेरिकी डॉलर्स) प्रती किलो! ही कहाणी एखाद्या काल्पनिक गोष्टीपेक्षा काही कमी नाही. पण ही काही काल्पनिक गोष्ट नसून खरी गोष्ट आहे. हा माणूस आणि त्याची पत्नी मध्य प्रदेशात राहतात आणि हा आंबा पिकवतात.

विशेष म्हणजे या जोडीने माध्यमांना सांगितले की, मागील वर्षांपासून त्यांच्या आमराईत आंब्यांची चोरी होत आहे त्यामुळे त्यांनी यंदा आंबे चोरी होऊ नयेत म्हणून चक्क सुरक्षा रक्षक आणि कुत्रे या आंब्याच्या बागेमध्ये तैनात केले आहेत. बागेच्या मालक संकल्प यांनी सांगितले आहे की, जापानी आंब्याचे नाव ‘टाइयो नो टमँगो’ असे आहे. तसेच याला ‘एग ऑफ सन’ म्हणजेच सूर्याचे अंडे असे देखिल बोलले जाते.

अशी कोणती गोष्ट आहे जी या आंब्याला खास बनवते

–मियाझाकी आंबा आकारात मोठा आहे, ज्याचे वजन कमीतकमी 350 ग्रॅम आहे, त्यात 15% पेक्षा जास्त साखर सामग्री आहे.
–त्याची साल ही लाल आहे. हे फळ डायनासोरच्या अंड्यासारखे दिसते.
–जपानमध्ये हा आंबा बक्षीस किंवा भेट म्हणून दिला जातो. हे पास्ता, पार्फाइट्स, पुडिंग्ज आणि करी सारख्या पाककृतींमध्ये देखील वापरले जाते.
–या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे आंब्याला गोडव्यांसाह अननस आणि नारळाचे स्वाद असतो.
–एप्रिल ते ऑगस्ट या आंब्याचा पीक हंगाम असतो.
–या जातीच्या आंब्याच्या पिकासाठी उबदार हवामान आणि निरंतर चमकदार सूर्यप्रकाश,पाऊस आवश्यक असतो . एप्रिल ते ऑगस्ट या काळात आंब्याची उपलब्धता असते.
–हा आंबा झाडावरून तोडला जात नाही. आंबा पिकल्यावर तो जाळीत अडकून राहतो. मग ते आंबे तोडून विक्रीसाठी बाजारात आणले जातात. जपानी लोक मानतात की हे आंबे हातानी तोडाला तर त्याचे पोषकतत्व आणि चव कमी होते.
–या आंब्याच्या आरोग्य फायद्यांबद्दल बोलताना, हा आंबा बीटा कॅरोटीन, फॉलिक ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर आहेत. बीटा कॅरोटीनच्या समावेशामुळे हे फळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.