खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी आहे. पण 25 ते 40 दिवसांच्या पिकात अमेरिकन लष्करी आळीचा शिरकाव झाला आहे. धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबार, मधील शहादा, जळगाव मधील रावेर यावल, जळगाव, चोपडा आदी भागात मका पीक आहे. कापूस ऐवजी अनेकांनी मक्याची लागवड केली आहे. मक्‍याचे दर एप्रिल ते जून दरम्यान स्थिर होते त्यामुळे मक्याकडे शेतकरी वळाले पण या हंगामातही पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातही शिरपूरात अधिक प्रादुर्भाव आहे. जळगाव मधील एरंडोल, पाचोरा, चोपडा ,जळगाव भागात ही लष्करी आळी बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. कृषी विभाग कामगंध सापळे लावण्याचीशिफारस करीत आहे. कीटकनाशकांचा योग्य मात्रा नुसार फवारणीचे आवाहन करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कामगंध सापळे यांची खरेदी बाजारातून करावी लागत आहे.

तापी, गिरणा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रात मका पीक अधिक आहे. या भागात मध्यंतरी पावसाचा खंड पडला नव्हता शेतकऱ्यांनी सिंचन करून पीक वाचवले. पण पिकात 25 ते 40 दिवसात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. काही भागात हा प्रादुर्भाव अधिक आहे. नुकसान 25 ते 30 टक्के आहे तर काही भागात नुकसान 20 टक्के आहे. आळीचा अटकाव करण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत. कामगंध सापळे एकरी सहा यानुसार लावत आहे. यात कीडनाशक सापांवर एकरी किमान तीन हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना या आवडीमुळे अधिकचा करावा लागत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!