कांदा आणणार डोळ्यात पाणी …? आवक घटली ; भाव वधारला , कोणत्या बाजार समितीत किती मिळतोय भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी झालेल्या पावसाचा फटका कांदा पिकाला बसला. मात्र जुना कांडा शेतकऱ्यांनी बाजारात आणला आणि या कांद्याला भाव देखील चांगला मिळाला. सध्याचा विचार करता सध्या कांद्याची महत्वाची बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या चाकण बाजार पेठेत कांद्याचा भाव वाढला आहे. कांद्याच्या आवकेत घट झाल्यामुळे चाकणच्या घाऊक बाजारात कांद्याला प्रति क्विंटल 2 हजार ते 3 हजार 200 रुपये एवढा भाव मिळाला आहे. तर किरकोळ विक्रीत कांदा 32 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे कांद्याचे हे दर सर्व सामान्यांच्या डोळयात पाणी आणणार आहेत.

सद्यस्थितीला बाजारात कांद्याचे भाव प्रति क्विंटल 4 हजार 500 रुपये इतका झाला आहे. तर गेल्याकाही महिन्यांपासून साठवण केलेल्या जुन्या कांद्याचे भाव घसरले असून कांद्याही खराब होऊ लागल्याचे दिसून आले आहे.कांदा पावसात भिजल्यामुळं सकाळी खरेदी केलेलया ५० किलोच्या कांद्याच्या पिशवीतून २० किलोही चांगला कांदा मिळत नाही. साहजिक रिटेल बाजारात कांदा दुप्पट किंमतीने विकला जातो.सद्यस्थितीला बाजारात जुने कांदे एका रुपया ते २० रूपये प्रती किलोने खपले जात आहेत. बाजारात कांद्याची आवक घटल्याने भाववाढीत ही तेजी आहे. पुढील एक दीड महिन्यात भाव कमी होतील, असे मतही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

वाहतूक आणि काढणीचा खर्चही निघेना …

मार्केटमध्ये कांदा न्यायचा जाला तर त्याला काढणी आणि वाहतुकीचा खर्च हा येत असतो. पण, गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच मार्केटमध्ये पावसाळी कांद्याचा लिलाव होत नव्हता. आता लिलाव होतो, पण आलेला व्यापारी हा 2 ते 6 रुपये किलो या दराने कांदा मागतो. मग त्यात काढणी आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाही, अशी भावना शेतकऱ्यांने व्यक्त केली आहे.

कोणत्या बाजारात किती भाव (हे सरासरी भाव 11 नोव्हेंबर चे असून प्रति क्विंटलचे आहेत )

अहमदनगर कोपरगाव 2500
अहमदनगर राहता 2850
अहमदनगर राहुरी वांबोरी 2500
औरंगाबाद 1900
जळगाव चाळीसगाव 2400
जळगाव 190
कोल्हापूर 2000
नाशिक चांदवड 2500
नाशिक देवळा 2500
नाशिक लासलगाव 2500
नाशिक लासलगाव 2650
नाशिक लासलगाव विंचूर 2650
मनमाड 1800
नामपुर 2700
सटाणा 2550
उमराणे 2350
येवला 2200
खेड चाकण 2800
पुणे 1900
पुणे मोशी 1600
पुणे पिंपरी 2550
सातारा 2200
वाई 2300
पंढरपुर 2800
सोलापूर 2300
सोलापूर 4000
कल्याण 3000

Leave a Comment

error: Content is protected !!