उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव ; अशी करा उपाययोजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन वर अळ्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून त्या फुले व कोवळ्या शेंगा वर फस्त करताना दिसून येत आहेत. याचा दुष्परिणाम म्हणुन झाडाला फुले दिसत नाहीत . यासाठी लवकरात लवकर फवारणी करावी व नुकसान टाळावे असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कडून करण्यात आले असूनयासंदर्भात त्यांनी पीक सल्ला दिला आहे .सद्यस्थितीतील सोयाबीन पिकांचे व्यवस्थापन याविषयी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी चे शास्त्रज डॉ.जी.डी.गडदे व प्रा.डी.डी.पटाईत यांनी पिक सल्ला दिला आहे तो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून त्यांनी काय शिफारसीत केले आहे.

सध्या सोयाबीन वर चक्री भुंगा,खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी ( स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच येणाऱ्या काळात रिमझिम पावसामुळे शेंगा लागण्याच्या अवस्थेत शेंगा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन खालील प्रमाणे कीड व रोगांचे व्यवस्थापन करावे.

पाने खाणाऱ्या व खोडकिडीच्या अळ्या व शेंगा करपा

अळी करीता

क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % – ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६%+ लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५% (संयुक्त कीटकनाशक) – २.५ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ५० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ % + लँम्बडा सायहँलोथ्रिन ४.६ %- – ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली (संयुक्त कीटकनाशक) किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ % + इमिडाक्लोप्रीड १९.८१ % (संयुक्त कीटकनाशक) – ७ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १४० मिली फवारावे.

वरील कीटकनाशक सर्व प्रकारच्या अळी (खोडकीडी व पाने खाणा-या अळ्या) करीता काम करतात.म्हणून कीडीनुसार वेगळे किटकनाशक फवारणी करण्याची आवश्यकता नाही.

पानावरील ठिपके व शेंगा करपाकरीता

टेब्युकोनॅझोल १०%+ सल्फर ६५ % (संयुक्त बुरशीनाशक) – २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ % १२.५ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर २५० मिली फवारावे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००

Leave a Comment

error: Content is protected !!