तूर उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्रांना बाय…! बाय… !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील महत्वाचे पीक सोयाबीन आणि कापूस पिकानंतर आता पुढील मदार ही तूर पिकावर आहे. आता तुरीची आवक हळूहळू बाजारात होताना दिसत आहे, जानेवारी महिन्यापासून राज्यात तूर हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. हमीभाव केंद्रावर 6300 चा दर तुरीसाठी हमीभाव ठरवून दिला आहे. मात्र मागचे काही दिवसातील तूर बाजारभाव बघता तुरीला हमीभावाहून अधिक किंवा त्याच्या जवळपासचा दर मिळतो आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

अमरावती जिल्ह्याचा विचार करता अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा मार्केटिंगची सात आणि विदर्भ मार्केटिंगची आठ अशी एकूण 15 केंद्र सुरू करण्यात आली असून 4628 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापूर्वी मूग, उडीद व सोयाबीनचा ही शासकीय खरेदीला शेतकऱ्यांचा फार प्रतिसाद मिळालेला नाही. तुरीच्या बाबतीतही हीच स्थिती दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एक लाख 23 हजार दोनशे नऊ हेक्‍टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. यावर्षी तुरीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी तुरीचे दर कमी म्हणजे हमीदराच्या खाली होते. सध्या हा दर खुल्या बाजारात हमी दराच्या आसपास आहेत. काही ठिकाणी हमीभावाहून अधिक आहेत.

शनिवारी दिनांक 15 रोजी नवीन तुरीला आवक मात्र अत्यंत अल्प म्हणजे केवळ 277 पोत्यांची होती. गेल्या पंधरवड्यात तुरीला हमी भावाच्या आसपास भाव मिळू लागला आहे. तीन जानेवारी रोजी नवीन तुरीला पाच हजार चारशे ते पाच हजार 900 असा हमीभावापेक्षा कमी दर होता. मात्र आता राज्यातील अनेक बाजार पेठांमध्ये तुरीला हमीभावापेक्षा अधिक भाव ते आसपासचा भाव मिळतो आहे. तुरीच्या भावात आणखी वाढ होईल अशी शक्यता खुल्या बाजारातील खरेदीदारांनी वर्तवली आहे.

सध्याचे तूर बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/01/2022
तुळजापूरलालक्विंटल55605060506050
18/01/2022
अहमदनगरक्विंटल406540060005700
शहादाक्विंटल26517657715500
दोंडाईचाक्विंटल37550062005862
राहूरी -वांबोरीक्विंटल30530159045602
पैठणक्विंटल65580060416000
भोकरक्विंटल64540059105655
कारंजाक्विंटल1200470062005730
श्रीगोंदाक्विंटल292600062006100
श्रीरामपूरक्विंटल2510051005100
परळी-वैजनाथक्विंटल20570059505850
मालेगाव (वाशिम)क्विंटल146520061005500
हिंगोलीगज्जरक्विंटल335580061005950
मुरुमगज्जरक्विंटल348580063506075
मनमाडहायब्रीडक्विंटल1480057005501
गंगापूरहायब्रीडक्विंटल110576859955811
जालनाकाळीक्विंटल16470054005000
करमाळाकाळीक्विंटल43550058005700
लासूर स्टेशनकाळीक्विंटल54540055535500
गेवराईकाळीक्विंटल1550155015501
सोलापूरलालक्विंटल15530158105475
लातूरलालक्विंटल2555572665926300
जालनालालक्विंटल249515060515750
अकोलालालक्विंटल1030500063955700
अमरावतीलालक्विंटल1478550061985849
यवतमाळलालक्विंटल351515061605655
चोपडालालक्विंटल105572562006100
आर्वीलालक्विंटल210550063006000
चिखलीलालक्विंटल350470059705335
वाशीमलालक्विंटल1500550064006000
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल332483560055300
जिंतूरलालक्विंटल16550059505800
खामगावलालक्विंटल3284530063515825
मलकापूरलालक्विंटल1740510062955800
वणीलालक्विंटल29568557505700
सावनेरलालक्विंटल141470061575800
कोपरगावलालक्विंटल16500153995301
गेवराईलालक्विंटल3580058005800
परतूरलालक्विंटल48560060005900
तेल्हारालालक्विंटल300570062505950
मेहकरलालक्विंटल570570062555850
दौंड-केडगावलालक्विंटल90450057005300
औसालालक्विंटल106600163116240
कळंब (उस्मानाबाद)लालक्विंटल32575060515811
तुळजापूरलालक्विंटल50602560256025
मंगरुळपीरलालक्विंटल581470061006100
मंगळूरपीर – शेलूबाजारलालक्विंटल916560064006250
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल60550060005750
नेर परसोपंतलालक्विंटल131550059605775
पांढरकवडालालक्विंटल30620064006300
कळमेश्वरलालक्विंटल60450057705250
सिंदीलालक्विंटल14540058005700
देवळालालक्विंटल1350051055055
बोरीलालक्विंटल3600560056005
वर्धालोकलक्विंटल127555059955850
देउळगाव राजालोकलक्विंटल119550062006100
किल्ले धारुरलोकलक्विंटल2550059615961
परांडालोकलक्विंटल10600061506100
काटोललोकलक्विंटल38430060015200
जालनापांढराक्विंटल5514535064216150
औरंगाबादपांढराक्विंटल443529363535823
माजलगावपांढराक्विंटल264560063556200
जामखेडपांढराक्विंटल27580062006000
शेवगावपांढराक्विंटल145550062006200
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल31580060006000
करमाळापांढराक्विंटल541560062756100
लासूर स्टेशनपांढराक्विंटल780570061505900
गेवराईपांढराक्विंटल366537562005750
परतूरपांढराक्विंटल121600063256300
औसापांढराक्विंटल8410061015400
कळंब (उस्मानाबाद)पांढराक्विंटल88292163266001
तुळजापूरपांढराक्विंटल40602560256025

Leave a Comment

error: Content is protected !!