आज ‘ या ‘ ठिकाणी बरसणार वादळी पाऊस ; विदर्भांत उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील दिल्ली , राजस्थान , गुजरात, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर अरुणाचल प्रदेश मेघालय , पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि हिमालयाच्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. म्हणजेच संपूर्ण देशात काही ठिकाणी कडक ऊन तर काही ठिकणी पाऊस अनुभवायला मी मिळणार आहे.

उद्या विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
दरम्यान महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम आहे. आज (८) राज्यात उष्णतेची लाट काहीशी निवळणार असली, तरी उन्हाची ताप कायम राहणार आहे. तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.राज्यात उष्णतेची लाट काहीशी ओसरली असून, शनिवारपासून (९) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

आज ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता
अग्नेय मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर असलेल्या चक्राकार वारे वाहत आहेत. तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस पडत असून, आज (ता. ८) या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

कुठे किती तापमान ?
दरम्यान दिनांक सात एप्रिल रोजी नोंदविण्यात आलेले कमाल तापमान खालील प्रमाणे राज्यात अकोला येथे सर्वाधिक 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.पुणे ४०.१, नगर ४२.४, धुळे ४२, कोल्हापूर ३५.८, महाबळेश्‍वर ३२.१, मालेगाव ४१.६, नाशिक ३८.६, निफाड ३९.२, सांगली ३६.९, सातारा ३९.५, सोलापूर ४०.६, सांताक्रूझ ३३.८, डहाणू ३४, रत्नागिरी ३४, औरंगाबाद ४०.८, परभणी ४२.२, बुलडाणा ४३.२, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४२.६, गोंदिया ४१.५, नागपूर ४०.९, वाशीम ४१.५, वर्धा ४२.२, यवतमाळ ४०.९

Leave a Comment

error: Content is protected !!