काकडीच्या शेतीने केले शेतकऱ्याला मालामाल, काही महिन्यातच कमावले ७.२० लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो कृषी ऑनलाईन । बिझनेसच्या माध्यमातून छोट्या रकमेतून लाखो रुपये कमविण्याचा विचार अनेकजण करतात. पण खूप कमी लोक हे पूर्ण करतात. अशाच प्रकारे काकडीच्या शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमवणाऱ्या एका शेतकऱ्याची कथा प्रेरणादायी ठरली आहे. सुरजीत सिंह असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार काकडी आणि शिमला मिरची ची शेती ते करत आहेत. अशाप्रकारे शेडनेट हाऊस मध्ये शेती करण्याचे अनेक फायदे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामध्ये आपण कोणत्याही ऋतूत भाज्यांची शेती करू शकतो. यात कोणत्याही कीटकांचा आणि रोगाचा प्रसार होत नाही.  Kakdi chi Sheti Mahiti Marathi

सुरजीत यांनी एका वर्षात ३०० क्विंटल काकडी उत्पादन घेतले आहे. बाजारात त्यांना २४ रु प्रति किलो भाव मिळाला आहे. याद्वारे त्यांना एकूण ७ लाख २० हजार रुपये उत्पन्न झाले आहे. ज्याचा खर्च केवळ २ लाख ५० हजार रुपये आला होता. त्यांना ४ लाख ७० हजार रुपयांचा फायदा झाला आहे. २०१३ मध्ये अनेक फायदे बघून त्यांनी २ एकर शेतीत शेडनेट हाऊस फार्मिंग ची सुरुवात केली होती. आता ते १० एकर शेतीत ही शेती करतात. २५ सप्टेंबर २०१९ ला त्यांनी काकडीचे उत्पादन लावले होते.  पाणी बचतीसाठी आणि पोषक तत्वांसाठी त्यांनी सिंचन पद्धती अवलंबिली होती. Kakdi chi Sheti Mahiti Marathi

पीक चांगले येण्यासाठी संतुलित पोषक तत्वांचा प्रयोग खूप महत्वपूर्ण आहे. म्हणून त्यांनी 19:19:19 उर्वरक 3 किलोग्राम, 12:61:00 उर्वरक 3 किलोग्राम, 13:00:45 उर्वरक 2 किलोग्राम, कैल्शियम नाइट्रेट 4 किलोग्राम, मैग्नीशियम सल्फेट 3 किलोग्राम, 00:00:50 उर्वरक 3 किलोग्राम असे आठवड्यातून एकदा घातले. आठवड्यातून २ -३ वेळा सिंचन केले. आता पीक कापणी होते आहे. काकडी काढल्यानंतर ते पॅकिंग हाऊस मध्ये घेऊन येतात आणि तिथे काकडीचे ग्रेडिंग केले जाते. त्यानंतर काकडी बागेत भरून बाजारात पाठवली जाते. Kakdi chi Sheti Mahiti Marathi

Leave a Comment

error: Content is protected !!