किसान क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या कर्जावर नक्की किती व्याज लागतं, सबसिडीचा फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन | शेतकऱ्यांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान किसान क्रेडीट कार्ड या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून गरज पडल्यास शेतकरी बँकेतूनही कर्ज घेवू शकतात. यासोबतच पीक विमा आणि सुरक्षा मुक्त विमा देखील लाभार्थ्यांना मिळू शकतो. देशभरातील साधारण कोट्यावधी शेतकरी या कार्डचा वापर करताना पाहायला मिळतात. या योजनेतून मिळालेल्या कर्जावरील व्याजही शेतकरी वाचवू शकतात. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज त्यांनी वेळेत परत केले तर त्यांच्या व्याजावर बचत होऊ शकते. Kisan Credit Card Information in Marathi

केंद्र सरकारने नुकताच या योजनेत अडीच कोटी शेतकऱ्यांना क्रेडीट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही ठराविक बँकांमधून कमी व्याजदरात खत, बियाणे आणि इतर शेतीविषयक कामांसाठी कर्ज उपलब्ध होते. कोणत्याही हमीशिवाय या कार्डच्या माध्यमातून १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. शेतकरी या कार्डवर तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेवू शकतात. ज्याची मुदत ५ वर्षांपर्यंत असते. या कर्जावर ७% व्याज आकारले जाते. Kisan Credit Card Information in Marathi

या कर्जाची परतफेड करत असताना सरकार तीन टक्क्यांची सबसिडी देते. जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज फेडले तर त्यांना ही सबसिडी मिळते. त्यामुळे या कर्जावरील व्याज वाचवायचे असल्यास शेतकरी आपले कर्ज वेळेत फेडून या सबसिडीचा फायदा घेवू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची नक्कीच बचत होवू शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!