अजूनही तुम्ही KCC काढले नाही? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया आणि कागदपत्रे ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येते. वर्षभरातचं त्याची परतफेड करावी लागते. पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. कोरोना काळात दोन कोटी शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड देण्यात आली आहेत.

KCC साठी महत्त्वाचे कागदपत्रे

–आयडी प्रुफ
–अ‍ॅड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स असावेत.
–अर्जदाराचा पासपोर्ट फोटोदेखील आवश्यक आहे.

किती मिळते कर्ज

–किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं.
–केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते.
–शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं. किसान क्रेडिट कार्ड घेताना शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्यांनी पूर्वी घेतलेल्या कृषी कर्जाची माहिती देणं आवश्यक आहे.

काय आहे प्रक्रिया ?

–KCC बनवण्यासाठी लागणारं प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आलं आहे.
–बँकांना गावांगावामध्ये कँम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
–किसान क्रेडिट कार्डला अर्ज करण्यासाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जावा.
–तिथे तुमच्या जमीनीची माहिती, पिकाची माहिती भरा.
–केसीसी फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि बँकेत नेऊन जमा करा.

कोण बनवू शकेल KCC

–शेतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती, जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल, तो केसीसी बनवू शकतो.
–कर्जाची मुदत संपेपर्यंत केसीसीसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे.
–60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे.
–हा अर्जदाराचा जवळचा नातेवाईक असू शकतो. सह-अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!