Kisan Credit Card Update : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. या योजनांचा शेतकरी देखील लाभ घेत असतात. मात्र या योजनांसाठी काही अटी आणि शर्ती लागू करून या योजनांचा लाभ दिला जातो. मात्र बऱ्याचदा असे आढळून येते की काही लोक याचा गैरवापर देखील करतात. योजनांचे खरे लाभार्थी योजनांपासून वंचित राहून इतर व्यक्तीव्ह या योजनांचा फायदा घेताना आपल्याला दिसतात.
दरम्यान, सरकारी योजनांमध्ये गैरप्रकार केल्याच्या अनेक बाबी आढळून आल्या आहेत. सध्या देखील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे संबंधित असलेल्या पीएम किसान कार्ड योजनेमध्ये एका व्यक्तीच्या नावे एका पेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड असल्याचे आढळून आले आहे. (Kisan Credit Card Update)
“…तर किसान क्रेडिट कार्ड रद्द होईल”
किसान क्रेडिट कार्डचा जर आपण विचार केला तर या योजनेमध्ये देखील सध्या अनेक गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. एका शेतकऱ्याच्या नावावर जास्त किसान क्रेडिट कार्ड आढळून आले आहेत. सध्या ते किसान क्रेडिट कार्ड ताबडतोब रद्द करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. त्याचबरोबर या शेतकऱ्यांवर कारवाई होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.
बऱ्याचदा अनेकजण एकापेक्षा जास्त किसान कार्ड वापरून सरकारी योजनांचा लाभ घेतात. यामुळे पात्र लाभार्थी अशा योजनांपासून वंचित राहतात आणि ज्या व्यक्तींना गरज नाही अशा व्यक्तींना या योजनांचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून एकापेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड एकाच शेतकऱ्याच्या नावावर असेल तर ते कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे?
शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजूनही किसान क्रेडिट कार्ड काढले नसेल आणि तुम्हाला ते काढायचे असेल तर तुम्हाला एक सोपी गोष्ट करायची आहे. तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे आहे. याच्या माध्यमातून तुम्ही किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे यासंबंधी सर्व माहिती मिळू शकतात. त्याचबरोबर यासाठी अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? याबाबत देखील तुम्हाला माहिती मिळेल त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.