Kisan Mart : आता विका ऑनलाईन शेतमाल, केंद्र सरकारची ‘किसान मार्ट’ सुविधा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र सरकारने नुकताच 7 मार्च 2024 रोजी राज्यातील शेतकऱ्यासांठी ‘महा ॲग्रो मार्ट’ (Kisan Mart) नावाच्या अँपद्वारे शेतमाल विक्रीसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. अशातच आता केंद्र सरकारने देखील देशभरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल ऑनलाईन विक्री करता यावा. यासाठी ‘किसान मार्ट’ (Kisan Mart) नावाने शेतमाल विक्रीसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची तयारी सुरु केली आहे. ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या सुविधेप्रमाणे ग्राहकांना ऑनलाईन विकता येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात होणार सुरु (Kisan Mart Portal For Indian Farmers)

कृषी मंत्रालयाच्या उपलब्ध माहितीनुसार, बंगळुरू येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) कृषी तंत्रज्ञान व संशोधन संस्थेकडून ‘किसान मार्ट’ची (Kisan Mart) निर्मिती केली जात आहे. हा ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म साधारणपणे यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे याचा देशभरातील शेतकरी, बचत गट, स्वयं सहाय्यता गट, स्टार्टअप, लहान मोठे व्यावसायिक व शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने, प्रक्रिया केलेली उत्पादने व शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांनो, आता विका ऑनलाईन शेतमाल; राज्य सरकारने सुरु केलीये ‘ही’ सुविधा! (https://hellokrushi.com/online-farming-sale-farmers-maharashtra-government/)

पोस्ट विभागाकडे माल पोहोचवण्याची जबाबदारी

बंगळुरू येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक हिमांशु पाठक यांनी या पोर्टलबाबत बोलताना म्हटले आहे की, आयसीएआर देशभरात ‘किसान मार्ट’ (Kisan Mart) हे पोर्टल सुरु करण्यासाठी खूप आशावादी आहे. या पोर्टलमुळे देशातील लाखो शेतकरी आणि कृषी स्टार्टअप्सना आपला माल थेट ग्राहकांना विक्री करता येणार आहे. त्यामुळे हा कृषी क्षेत्रासाठीचा गेम चेंजर प्रोजेक्ट असणार आहे. विशेष म्हणजे भारत सरकार आणि भारतीय पोस्ट विभाग यांच्यामध्ये ऑनलाईन शेतमाल विक्रीनंतर ग्राहकांना माल पोहोच करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी करार होणार आहे. ज्यामुळे या संपूर्ण प्रोजेक्टला विश्वासार्ह रूप प्राप्त होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

सर्व सामान उपलब्ध होणार

शेतकऱ्यांना देखील सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात. यासाठी देखील काम केले जात असून, शेतकऱ्यांना प्रामुख्याने आपला भाजीपाला, खाद्यतेल, मसाले, अन्नधान्य, फळे हे आणि सर्वच शेतीमाल या पोर्टलद्वारे विक्री करता येणार आहे. अर्थात ग्राहकांना देखील किसान कार्टवर येऊन आवश्यक त्या गोष्टी अगदी सहजपणे खरेदी करता येणार आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधे आणि शेतीशी संबंधित अन्य सर्व गोष्टी याच पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पोर्टलद्वारे अधिकचा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!