जाणून घ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०२१ , ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०१८-१९ पासून सुरु करण्यात अली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही. या योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी वर सुरु करण्यात आली आहे.

–या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येते. लाभार्थी –शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% असणे गरजेचे आहे.
–हे प्रमाण जर कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे गरजेचे आहे.
–अश्याप्रकारे शेतकऱ्याला १००% अनुदान ३ वर्ष्यात फळबाग लागवडीवर मिळणार आहे .
–अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
–या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीच जास्त १० हे. तर इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीच जास्त ६ हे. क्षेत्र मर्यादेत लाभ घेऊ शकतो.

योजनेतील मंजूर रक्कम

राज्यात ही योजना २०२०-२१ मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ४०% च्या मर्यादेत खर्च करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता २२ जानेवारी २०२१ रोजी मंजूर झालेल्या gr मध्ये देण्यात अली आहे.सदर मंजूर शासन निर्णयामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. १००००.०० लाख मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ४० टक्के च्या मर्यादित म्हणजेच रु. ४०००. ०० लाख एवढ्या रकमेस प्रशासनाकडून मान्यता दिली आहे. एकूण ४००००. ०० लाख निधीपैकी रु. २०००. ०० लाख निधी यापूर्वीच कृषी आयुक्त कार्यालयास वितरित करण्यात आला आहे. आणि उर्वरित रुपये. २०००. ०० लाख निधी कृषी आयुक्त यांना अर्थसंकल्प वितरित करण्याचा नवीन शासन निर्णय २२ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आला.

पात्रता व कागदपत्रे :

–लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.
–सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
–लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना लय योजनेचा लाभ देय नाही.
–शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे गरजेचे आहे.
— संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
–७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
–परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
–इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!