Land Survey : शेतीची अचूक मोजणी होणार; शेतकऱ्यांमधील वादावादी मिटणार; वाचा जीआर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी अनेकदा आपली जमीन कमी जाणवल्यास, सरकारी मोजणी (Land Survey) करतात. मात्र, यापूर्वी शेतकऱ्यांना मोजणी केलेल्या जमिनीची ‘क’ प्रत मिळवण्यासासाठी अनेक अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांना वारंवार सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता राज्य सरकारने जमीन मोजणी करणाऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ‘ई-मोजणी 2.0’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची अचूक माहिती मिळण्यासह, जमिन मोजणीचे (Land Survey) नकाशे अक्षांक्ष, रेखांशासह ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

जमिनीची अचूक माहिती (Land Survey Farmers Disputes Resolved)

राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीची हद्द कायम करणे, पोटहिस्सा, सामिलीकरण, बिनशेती, कोर्ट वाटप, कोर्ट कमिशन आणि विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन आदींसाठी मोजणीचे काम केले जाते. सरकारी मोजणी झाल्यानंतर अर्जदारांना/शेतकऱ्यांना मोजणी नकाशाच्या ‘क’ प्रती पुरविल्या जातात. या मोजणी नकाशाच्या ‘क’ प्रतीमध्ये जागेवर प्रत्यक्ष मोजणी वेळी वहिवाटी किंवा ताब्याप्रमाणे अभिलेखाप्रमाणे येणार्‍या हद्दी दर्शवून योग्य परिमाणात संबंधित टिपा नमूद मोजणी नकाशाची ‘क’ प्रत पुरविली जाते. मात्र, आता जमीन मोजणीच्या या सर्व गोष्टी अचूक होणार असून, या निर्णयामुळे संबंधित जमीन नेमकी कुठे आहे? तिचा आकार कसा आहे? याची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा : जमीन मोजणी अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर… (https://hellokrushi.com/land-survey-application-process-in-maharashtra/)

शेतकऱ्यांमधील वाद कमी होणार

राज्य सरकारकडून ‘ई-मोजणी 2.0’ संगणक प्रणाली सुरु करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे येणारे जमीन मोजणी अर्ज हे जीआयएस आधारीत रोव्हर्सद्वारे मोजणी केले जात आहे. त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक जमिनीच्या हद्दीचे तंतोतंत अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत. परिणामी जमिनीची अचूक मोजणी होऊन, शेतकरी आणि जमीन धारकांमधील वाद कमी होण्यास मदत होणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी केलेल्या सर्व जमिनींचे जीआयएस आधारीत मोजणी नकाशे अक्षांक्ष, रेखांशासह सरकारच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पुरविले जाणार आहे. त्यामुळे एखाद्या सरकारी मोजणी झालेल्या जमिनीचे नकाशे शेतकऱ्यांना तत्काळ ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

सध्याच्या घडीला राज्यातील 106 तालुक्यांमध्ये या ‘ई-मोजणी 2.0’ प्रणालीच्या माध्यमातून जमीन मोजणीची कामे सुरू आहेत. चालू वर्ष अखेरपर्यंत ही ‘ई-मोजणी 2.0’ योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याचा भूमी अभिलेख विभागाचा मानस आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी केल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. त्यांना मोबाईलवरच हे जमीन मोजणी नकाशे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

(वाचा याबाबतचा संपूर्ण जीआर : https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402021514222519.pdf)

error: Content is protected !!