Heavy Rain : जमिनी खरडून गेल्या, मराठवाड्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका ; पंचनामे सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन आठवड्यात राज्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला. या पावसात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार जवळपास 3 लाख 38 हजार 88 हेक्टरचे नुकसान झाले असून, याचा 3 लाख 51 हजार 499 शेतकऱ्यांना फटका बसलाय त्यातही सर्वधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

जमिनी खरडून गेल्या

नांदेड जिल्ह्यात 3 लाख 30 हजार 357 शेतकऱ्यांचे अंदाजे 3 लाख 20 हजार 879 हेक्टरचे (Heavy Rain) नुकसान झाले आहे. तब्बल 261 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. हिंगोली जिल्ह्यात 19 हजार 197 शेतकऱ्यांचे 15 हजार 944 हेक्टरचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यात1500 शेतकऱ्यांचे 1200 हेक्टर नुकसान झाले. जालना जिल्ह्यात 377 शेतकऱ्यांचे 50 हेक्टरचे नुकसान झाले असून, 205 हेक्टर खरडून गेली आहे.

मराठवाड्यात आज विजांसह पावसाची शक्यता

कोकण घाटमाथ्यासह राज्यातील इतर भागातला पाऊस सध्या ओसरला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक १८ जुलै रोजी पूर्व विदर्भ भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार (Heavy Rain) पाऊस पडेल, उत्तर महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचाही शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!