मागील वर्षीचा गुळ अद्यापही शीतगृहामध्ये पडून, यंदा दरावर होणार परिणाम ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उसतोडणीला सुरवात झाल्यापासून राज्यातल्या अनेक गुऱ्हाळघरामध्ये देखील गजबज सुरु आहे. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गूळ तयार केला जातो. येथील गूळ हा इतर राज्यांमध्ये देखील पाठवला जातो. गुजरात राज्यात देखील गुळ पाठवला जातो मात्र मागील वर्षीचा गुळच अद्याप शिल्लक असल्यामुळे यंदा गुळाची खरेदी कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. मागणीच कमी असल्याने त्याचा दरावरही परिणाम झाल्याचा पाहायला मिळतो आहे. सध्याचा विचार करता सध्या गुळाला ३८०० ते ४००० प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे.

बदलत्या वातावरणाचा गुळ व्यवसायावर परिणाम
यंदाच्या वर्षी इतर व्यवसाया बरोबरच गुळ व्यवसायांवर देखील नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे जवळजवळ पंधरा दिवस गुराळ घराचे काम थंडच होते. गेल्या काही दिवसांपासून गुळ निर्मितीला हळूहळू वेग येताना दिसतो आहे. पण गुळाची आवक काही प्रमाणात कमी असली तरी देखील तितक्याच उत्साहानं खरेदी होत नसल्याचे चित्र दिसत आहे.

डिसेंबर मध्ये प्रामुख्याने व्यापारी शीतगृहात साठवण यासाठी गुळाची खरेदी करतात. डिसेंबरमध्ये सर्वसाधारणपणे गुळाची आवक ही ज्यादा प्रमाणात होत असते. त्यामुळे व्यापाऱ्यांचा रोजच्या विक्री पेक्षा जादा गूळ खरेदी करण्याकडे कल असतो. शीतगृहात साठवलेला गूळ वर्षभर ग्राहकांना पोहोचवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून खरेदी केला जातो. सध्याचे बाजारातील चित्र पाहता ग्राहकांच्या मागणीनुसार बाजारात गूळ उपलब्ध होत असल्याने शीतगृहातील गूळ तसाच राहिला आहे. त्यामुळे व्यापारी तो गूळ पहिल्यांदा विक्री करण्याचा प्रयत्न करतात परिणामी सध्या गुळाचा उठाव कमी असल्याचं चित्र आहे याचा परिणाम गुळ दरावर ही होत आहे.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!