रब्बी हंगाम स्पेशल ! चार महिण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या लसूण पिकाची लागवड ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो कृषी ऑनलाईन । ऑक्टोबर महिना सुरु झाला असुन आता पावसालाही परतीचे वेध लागले आहेत. राज्यात अजुनही काही ठिकाणी पाऊस पडत आहे. बहुतांश भागात खरिप पिके काढणीस आलेली आहेत. शेतशिवारात वाफसा नसल्यामुळे रब्बीसाठी शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. रब्बी ज्वारी, हरबरा, जवस, करडई, गहू इत्यादी पिकांसह या हंगातामात पुढील नोव्हेंबर महिण्यापर्यंत राज्यातील शेतकरी कमी अधिक प्रमाणात लसूण पिकाची लागवड करतात. यापिकातुन चार महिण्यात चांगले उत्पादन व पैसाही मिळतो. काढणीनंतर वर्षभर या पिकाची चांगला भाव मिळेपर्यंत साठवणही करता येते. म्हणून दररोज प्रत्येक घरातील स्वयंपाकाची चव वाढवणाऱ्या शिवाय औषधी गुणधर्म असणाऱ्या या पिकाची लागवड ते काढणी ची संपूर्ण माहीती आम्ही आणली आहे खास तुमच्यासाठी. Lasun Lagwad Information in Marathi

१)लसूण पिकासाठी जमिनीची निवड करताना…..

लसूणाचे कंद जमिनीत वाढत असल्याने पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुशीत कसदार जमीन या पिकासाठी निवडावी.

२)कसे हवामान लागते ?….

लसूण लागवड करण्यासाठी थंड हवामान लागते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लागवड करावी. लसूण पक्व होत असताना व काढणीच्या काळात कोरडे हवामान आवश्यक आहे. Lasun Lagwad Information in Marathi

पिकाचि जात – फुले नीलिमा ,फुले बसवंत, गोदावरी, श्वेता, यमुना सफेद, फाउंलाईट इत्यादी.

३)लागवड चा कालावधी……..

लसूणाची लागवड सपाट वाफ्यात करावी .कारण लसुन जमिनीत खोल वाढतो. जमिनीत कुजलेले शेणखत 25 ते 30 टन मिक्स करून घ्या व जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधावी4×2/3×2 मीटर अंतरावर सपाट वाफे करावीत. जमिनीला जास्त उतार असेल तर 1.5 t2 मीटर रुंद10t12 सेमी लांबीचे वाफे करून लागवड करावी. सपाट वाफे ची रुंदी15 सेमी अंतरावर खुरप्याच्या साह्याने रेघा पाडून त्यांत 10 सेमी अंतरावर उभ्या पाकळ्या रोवून मातीने झाकाव्यात .लागवडीच्या वेळी बियाणे दहा लिटर पाण्यात 20 मिली कार्बोसल्फान व 15 गरम कार्बनडाझिम च्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. Lasun Lagwad Information in Marathi

४ ) खत व्यवस्थापन……..

लागवडीच्या वेळी कुजलेले शेणखत 25 ते 30 टन जमिनीत मिसळाव .100 किलो नत्र ,50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावीत. नंतर उरलेली दुसरी नत्राची मात्रा दोन वेळा विभागून द्या. पहिली मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी, दुसरी मात्रा लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी तसेच लागवडीच्या वेळी अमोनियम सल्फेट व सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा उपयोग केल्यास गंधकाची मात्रा तयार होते. Lasun Lagwad Information in Marathi

पाणी व्यवस्थापन- लसणाची लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्याव.आंबवणी चार ते पाच दिवसांनी द्यावी. लसणाची मुळे 15 ते 20 या थरात असतात त्यामुळे वरच्या थरात ओलावा असणे आवश्यक आहे .या पिकास आवश्यकतेनुसारपाणी द्यावे. पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. Garlic Farming

५) रोगनियंत्रण………….

किडी…
१) फुल किडी ही नुकसानकारक किड आहे. सकाळी किंवा रात्रीच्या वेळी आक्रमण करते .ही पानावरील रस शोषून करते त्यामुळे पात पांढरी पडून वाकडी होते. पात वाकडी झाल्यास लसनाचे पोषण होत नाही. उपाय ,दहा लिटर पाण्यात स्टिकर घेऊन + कार्बोसल्फान 20 मिली+ सापर मिथ्रीन 10 मिली घेऊन फवारणी करावी. Lasun Lagwad Information in Marathi

किड २)
करपा उपाय ,करपा हा बुरशीजन्य रोग आहे .या रोगामुळे पाण पिवळी पडतात आणि पानावर चट्टे वाढतात. पाणे सुकतात .उपाय 25 ते 30 मिलि डायथेन m45 आणि कार्बनडाझिम 20 मिली गरम स्टिकर 15 मिली घेऊन फवारणी करावी.

किड ३)
कंदकूज उपाय ,ही बुरशी लसनामध्ये वाढते ही बुरशी आत शिरल्याने पाकळ्या मऊ होतात व काळया रंगाचा थर जमा होतो. उपाय निरोगी बियाणे वापरावे लागवडीच्या वेळी वापरत भरपूर पाणी द्यावे. Lasun Lagwad Information in Marathi

६) हेक्टरी किती उत्पादन मिळते?…….

लसणाची पीक 120 ते 130 दिवसांत काढणीस तयार होते. लसणाची वाढ झाली की पानांची वाढ थांबते .पाने पिवळी पडतात. पाने वाळण्यापूर्वी काढणी करावी. जेणेकरून पेढी बांधणे सोपे जाईल .लसूण खुरप्याने किंवा कुदळीच्या सहाय्याने काढणी करावी .लसुन दोन दिवस शेतात तसाच ठेवावा ,पातीने योग्य झाकावा. त्यानंतर जुड्या बांधणी करावी व झाडा खाली किंवा घरात वर बांधाणी करावी. हेक्टरी उत्पन्न 10 ते 15 टन मिळते. Lasun Lagwad Information in Marathi

७) तणनाशक जमते का ?

लसन लागवडी पुर्वी कोरड्या जमीन असताना ,तयार वाफ्यावर पेंडामेथिलीन या तणनाशकाची प्रतिपंप 80 मिली याप्रमाणे फवारणी करावी. यानंतर लसनाच्या पाकळ्यांची लागवड केली असता, तणाचा बंदोबस्त करता येतो.

Leave a Comment

error: Content is protected !!