जाणून घ्या गाई – म्हशींमध्ये होणारा स्तनदाह आणि औषधोपचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्तनदाह रोगास ग्रामीण भागात थनरोग किंवा दुधात खराबी येणे असे म्हणतात. अधिक तर हा रोग विभिन्न प्रकारच्या जिवाणूद्वारा उद्भवतो. जोकी जनावरांच्या सडावर जमा होतात. आणि ओव्यास झालेल्या इजा अथवा घाव यामध्ये किंवा सडाच्या छिद्रात पोहोचतात व कासेमध्ये प्रवेश करतात. या रोगाचे तीन प्रकार आढळतात.

१) लक्षणरहित रोग 
या रोगाचे निदान दुधाचे परीक्षण केल्यावरच होते कारण या प्रकारच्या बाधेत स्तन सुजत नाही किंवा दुधात कोणताही खराबी दिसत नाही. म्हणूनच हा आजार जास्त नुकसानदायक असतो

२ ) लक्षण सहित रोग 
या रोग बाधित ओव्याची सुज , दूध नासने (फाटणे ) व पुष्कळदा दूध अतिशय पातळ आणि पिवळे इत्यादी लक्षणे आढळतात .

३ ) जुनाट रोग 
या रोगात जनावराच्या ओव्यात रोगकारक जंतू दीर्घकाळपर्यंत वास्तव्य करून आपली संख्या वाढवितात , दूध तयार करणार्‍या ग्रंथी यांचा नाश करतात व ओवा आकाराने लहान व खडक होतो .

औषध उपचार –
हा आजार समजल्या बरोबर पशु वैद्यकांशी तात्काळ संपर्क करून आजारी जनावरांचा लवकर उपचार करायला हवा अन्यथा या बाधेत दूध तयार करणाऱ्या पेशी मध्ये खराबी येते आणि दूध निर्मिती थांबते.

रोग नियंत्रण –
१) जनावरे आणि गोठे स्वच्छ ठेवा.

२ ) जनावरांच्या सडाला इजा होऊ देऊ नका

३ ) दूध काढण्यापूर्वी कास व सडाना स्वच्छ पाण्याने धुऊन काढा.

४ ) दूध काढण्यापूर्वी दोहनाऱ्याने हात स्वच्छ धुतले पाहिजे .

५ ) ज्या सडात खराबी आहे त्या सडाचे दुध शेवटी काढा व ते उपयोगात आणू नका किंवा वासरांना पाजू नये .

६ ) दूध काढल्यावर सड जिवाणू रोधक ( अँटीसेप्टिक ) द्रावण

(पोलीसान ) डी. सोडियम

हायपोक्लोराईड अथवा savlon ०.५ टक्के द्रावणाने दररोज दूध दोहल्यावर टीट – डीप करायला हवे .

७ ) दुध दोहन झाल्यावर जनावर किमान अर्धा तास उभे राहील याची दक्षता घ्या .

स्तनदाह या रोगावर नियंत्रण ठेवल्यास औषध उपचाराचा खर्च आणि पर्यायाने आर्थिक नुकसान वाचविता येईल .

संदर्भ : कृषी जागरण

 

Leave a Comment

error: Content is protected !!