‘माईकोरायझा’ अशी बुरशी जी पिकांच्या वाढीसाठी ठरते संजीवनी, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आपण आपल्या शेतात पपई ,केळी,मिरची, हळद,ऊस,सोयाबीन, कापूस,संत्रा,अद्रक, अश्या पिकाची लागवड करता आहात किंवा केली आहे का? तर तुमच्याउत्पन्नात वाढ होण्यासाठी रासायनिक खतांऐवजी माईकोरायझा ही बुरशी पिकांसाठी संजीवनी ठरते. ही एक अतिशय उपयुक्त बुरशी आहे. जाणून घेऊया माईकोरायझाबद्दल

माईकोरायझा बुरशी नक्की काय करते ?

–माईकोरायझा एक उपयुक्त बुरशी आहे, जी मातीपासून पोषक द्रव्ये घेऊन व्हॅस्क्युलर झाडांच्या मुळांना प्रवेश करते.
–ही बुरशी वैज्ञानिकदृष्ट्या सुदृढ आणि खनिज पोषणद्रव्ये मातीपासून थेट यजमान वनस्पतीच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत.
–अंदाजे 80% ज्ञात वनस्पतींच्या प्रजाती, ज्यामध्ये सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या नगदी पिके सोयाबीन, कापुस, ऊस, केळी, पपई हळद, वैगरे आहेत, त्यांच्याशी सुसंगत सहजीवन पद्धतीने जगते.
–झाडे आणि माती मधे माईकोरायझा हे परस्पर फायदेशीर भागीदार आहेत.
–परंतु दुर्दैवाने, हे फायदेशीर माईकोरायझा बुरशी मानवनिर्मित लँडस्केपच्या विकासात नष्ट होत चालली आहे, ज्यामुळे या वातावरणातील वनस्पतींना अतीशय संघर्ष करावा लागत आहे.
–मईकोरायझा बुरशी मूळ प्रणालीची वसाहत करते, तंतूंचा एक विशाल नेटवर्क तयार करते. हे बुरशीजन्य पध्दत आर्द्रता टिकवून ठेवते आणि नैसर्गिक मूलद्रव्य शोषण करण्यासाठी नैसर्गिकरित्या खनिज व पोषक द्रव्ये आणी अनलॉक करणारी शक्तिशाली एन्झाईम प्रणाली तयार करते.
–वनस्पतीच्या मुळाशी जोडण्याच्या त्यांच्या अविश्वसनीय क्षमतेमुळे माईकोरायझा सूक्ष्मबुरशी मुळांच्या विस्तार झपाट्याने करते व आसपासच्या जमिनीच्या मोठ्या प्रमाणातील पाणी आणि पोषक द्रव्ये षोशन करुन त्यास वनस्पतींच्या मुळात आणते.
–वनस्पतींची पोषण आणि वाढ सुधारते. माईकोरायझा बुरशीजन्य तंतूचे नेटवर्क तयार करुन हे सूक्ष्म तंतु जमिनीत वाढतात आणि अधिक पोषक द्रव्ये षोशन करुन मुळांना पुरवतात.
–अतिरिक्त पाणी आणि पोषक द्रव्य वनस्पतींना पुरवून, माईकोरायझा हे वनस्पतींची प्रतिकारशक्ती आणि आरोग्यासाठी योगदान करते. माईकोरायझा बुरशी मुळे आपन चांगल्या नैसर्गिक जीवनसत्त्व आसलेले पोषकद्रव्ये असलेले अन्न धान्य पीकवु शकतो.
–माईकोरायझा वनस्पतींच्या मुळाशी मिळताच नवीन शाखा सुरू होताना दीसते त्यामुळे झाडांची काईक वाढ चांगली.
माईकोरायझा सारखी उपयुक्त बुरशीची उत्पत्ती करुन साधारण 100 ग्रॅम (वैम HD) माईकोरायझा = 200000 प्रोपॅगुल्स आहे.

माईकोरायझाचे फायदे

माईकोरायझा हे एक फॉस्परसयुक्त खतांमधे मोडले जाते कारण ते जमिनीत फॉस्परस सोबत पोषक पदार्थ सोडते. माईकोरायझा बुरशी नैसर्गिक, कमी प्रकाशात खतांचा मेळ घालुन मुळ्या मजबूत प्रवतिरोधी तसेच निरोगी झाडे तयार होतात.
माईकोरायझा उपचारांपासून आम्ही काय अपेक्षा करू शकतो?
1)झाडाची चांगली आणि अधिक संतुलित वाढ होते.
2)मातीतील सुक्ष्मद्रव्ये.फॉस्परस व पोषक एन्झाईम्स मुळा पर्यंत पोहचविते.
3) फुलं आणि फळ धारणा अधिक मिळते
4) हानीकारक बुरशीची वाढ होउ देत नाही

संदर्भ : कृषी जागरण

 

Leave a Comment

error: Content is protected !!