जाणून घ्या गुलकंद प्रक्रिया, विकसित करा तुमचा ‘गुलकंद ब्रँड’क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गुलकंदाला आयुर्वेदिक महत्त्व आहे. गुलकंद हा गुलाबपाकळ्या आणि खडीसाखर याचे मिश्रण करून तयार झालेला पदार्थ आहे. घरच्या घरी आपण हा पदार्थ तयार करू शकतो. गुलाबशेती करणाऱ्यांसाठी; तसेच महिला बचत गटांसाठीही गुलकंदनिर्मिती हा चांगला जोडधंदा आहे. गुलकंद तयार करून तुम्ही तुमचा छोटेखानी व्यवसाय सुरु करू शकता. तसेच गुलकंद तयार करून स्वत:चा गुलकंद ब्रँड तयार करू शकता.

गुलाब फुलांचा उपयोग हार बनविण्यासाठी होतोच, त्याच बरोबरीने गुलकंद, गुलाबपाणी, अत्तर, गुलाब तेल, जेली उदबत्ती बनविण्यासाठी केला जातो. गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. याचबरोबरीने एव्हान, क्रिमझन ग्लोरी हार्ट थ्रॉब, ब्ल्यू मून, मॉन्टेझुमा, हैद्राबादी गुलाब या सुवासिक फुलांच्या जाती आहेत.

गुलकंद करण्याची कृती

साहित्य 1) गुलाब पाकळ्या, 2) खडी साखर, 3) प्रवाळ पिष्ठी

कृती

— गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. म्हणजे गुलकंदाला रंग व सुगंध चांगला येतो. देशी गुलाबांना जेवढा सुगंध असतो, त्या प्रमाणात विदेशी गुलाबांना नसतो.
— प्रथम पूर्ण उमललेल्या निरोगी फुलांच्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात. पाकळ्यांचे बारीक तुकडे करावेत. एक किलो खडी साखर (1ः1) या प्रमाणात एक थर पाकळ्या आणि एक थर खडी साखर असे काचेच्या बरणीत भरावे.
— काचेची बरणी उन्हात 4 ते 5 दिवस ठेवावी. उन्हामुळे साखरेचे पाणी होते. आणि त्यात या पाकळ्या मुरतात. असा चविष्ट गुलकंद 21 ते 25 दिवसांत खाण्यासाठी तयार होतो.

गुलकंदाचे फायदे

1) एक उत्तम पाचक आहे. उष्णतेपासून होणारे विकार, ताप, रक्तपित्त, कांजिण्या, शारीरिक दौर्बल्यावर उपचारासाठी गुलकंदाचा चांगला उपयोग होतो.
3) गुलकंद कांतिदायक तृष्णाशामक आहे.
4) गुलकंदामध्ये 10 टक्के प्रवाळ मिसळून वाढत्या वयाची मुले आणि शारीरिक दौर्बल्य असलेल्यांना दिल्यास ते शक्तिवर्धक म्हणून काम करते.
५)पित्त प्रकोप होत नाही पोटातील उष्णता कमी करण्याचे काम गुलकंद करतो.
६)गुलकंदामुळे यकृताची ताकद वाढते तसेच बुक आणि पचन सुधारण्यास मदत होते.
७)लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी गुलकंद फायदेशीर आहे.
८)बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्त्वांची आवश्यकता असते जी गुलकंद मध्ये आहे.
९)गुलकंद याच्या सेवनाने शरीर ताजंतवानं राहतो तसाच गारवा मिळतो उन्हामुळे येणारा थकवा आळस निघून जातो.

Leave a Comment

error: Content is protected !!