जाणून घ्या संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची कारणे आणि उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : संत्रा बागेत पाने पिवळी पडण्याची संभाव्य कारणे खालील प्रमाणे विशद करता येतील.

(१) बऱ्याच च् संत्रा बागेत कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली वाळत येतात. त्यामुळे फांद्यावरील पानेपिवळी पडतात व गळतात. फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पांढुरका दिसतो व त्यावर सूक्ष्म काळ्या गोल पुटकुळ्या दिसतात. अशी लक्षणे दिसल्यास ती शेंडे मर या रोगाची असू शकतात

(२) बऱ्याच वेळा संत्राच्या झाडाचा तजेलपणा नाहीसा होतो व काही बागांमध्ये संत्र्याच्या झाडाची एकच फांदी किंवा झाडाचा एकच भाग पिवळा पडलेला दिसतो अशा झाडावर फायटोप्थोरा बुरशीचा जमिनीतून प्रादुर्भाव झाला का याचे निदान करून घेणे गरजेचे असते.

(३) बऱ्याच वेळा जुन्या संत्रा बागेत त्याच जागेवर जमिनीचे निर्जंतुकीकरण न करता जमिनीचे निर्जंतुकीकरण न करता लागवड केल्यास व विशेषता झाडाचा कलम युतीचा भाग जमिनीजवळ किंवा जमिनीत गाडला गेल्यास अशा संत्रा बागेत पाय कुज व मूळकूज या रोगाचा प्रादुर्भाव होतो. झाडाची मुळे तंतुमय मुळ्या कडुन मुख्य मुळ्याकडे कुजण्यास सुरुवात होते. मुळाची साल कुजून पुढे मुळाचा आतील भागही इतर बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कुजतो. अशा वेळेस रोगग्रस्त झाडाची पाने प्रथम मलूल होऊन मुख्य शिरा पिवळ्या पडतात व पुढे पूर्ण पाने पिवळी पडून गळून पडतात अशा रीतीने पूर्ण झाड पर्णहीन होऊन वाळते. अशा प्रकारची लक्षणे पाय कुज मुळकुज या रोगात आढळून येतात.

(४) बऱ्याच संत्रा बागेमध्ये जमिनीत चुनखडी चे प्रमाण दहा टक्क्यांच्या वर असेल तर अशा जमिनीत संत्र्याचे झाडास स्फुरद ,पोट्याश, झिंक व मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडू शकतात.

(५) बऱ्याच वेळा ज्या बागेत मृग बहार काही कारणास्तव फुटला नाही अशा बागेत पुन्हा एकदा आंबिया बहारा करिता तान दिल्यास तानाचे अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन न झाल्यामुळे पाणी पिवळी पडू शकतात व पानगळ सुद्धा वाढण्याची शक्यता असते.

उपाययोजना

(१) पाने पिवळ्या पडलेल्या संत्रा बागेला अतिरिक्त तान देण्याचे टाळावे
(२) माती परीक्षणाच्या आधारावर झाडाचे वय लक्षात घेऊन शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. सर्वसाधारणपणे दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या झाडासाठी एक किलो अमोनियम सल्फेट, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश याप्रमाणे झाडाच्या परिघात द्यावे. झाडाचे वय दहा वर्षापेक्षा कमी असल्यास खताची मात्रा अर्धी करावी.
(३) माती परीक्षणाच्या आधारावर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन झिंक सल्फेट दोनशे ग्रॅम लोह सल्फेट दोनशे ग्रॅम व बोरॉन 100 ग्रॅम प्रति झाड शेणखतात मिसळून जमीन द्यावे
(४) आवश्यकतेनुसार झिंक,लोह व बोरॉन हे अन्नद्रव्य असणारे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त फवारणीचे चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण 20 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन माती परीक्षणाच्या आधारावर अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास फवारणी करावी
(५) संत्रा झाडावर शेंडे मर या रोगाची ची वर निर्देशित लक्षणे आढळून आल्यास झाडावरील रोगग्रस्त व वाळलेल्या फांद्या किंवा सल पावसाळ्यापूर्वी काढून जाव्यात व त्यानंतर पानावरील ठिपके या रोगा करिता कॉपरऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

संदर्भ : कृषी जागरण

 

Leave a Comment

error: Content is protected !!