ह्याला म्हणत्यात नाद…! पेपर सोडून पोरगा पोहचला बैलगाडा शर्यत पहायला, शिक्षक आले शोधायला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये बैलगाडा शर्यतींचा धुराळा पुन्हा उडू लागला आहे. त्यातच कोरोना आटोक्यात आल्यामुळे गावागावात पुन्हा एकदा यात्रा जत्रा भरू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातल्या अनेक खेडोपाडी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. लाखो रुपयांची बक्षिसेही वेजेत्यांसाठी ठेवली जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील अर्थकारण रुळावर यायला सुरुवात झाली आहे. बैलगाडा शौकीनांमध्ये दांडगा उत्साह पाहायला मिळतो आहे. बैलगाडा शर्यतीदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडीओनुसार शाळेतला एक मुलगा आपला पेपर चुकवून बैलगाडा शर्यत पाहायला आला आहे आणि त्याचे शिक्षक त्याला शोधत शर्यतीच्या ठिकाणावर पोहचले आहेत. पेपर सोडून बैलगाडा शर्यत बघायला जाणाऱ्या या मुलाची मीडियावर चर्चा रंगली आहे.

नक्की काय आहे व्हिडीओ ?

सुजला जगदाळे … सुजल जगदाळे उर्फ़ बुलट… कुठं बसलाय बघा…शाळेत पेपरला बोलवायला हित आल्यात शिक्षक … अशा स्वरूपाची घोषणा या व्हिडिओमध्ये ऐकू येते. तर व्हिडिओमध्ये बैलगाडा शर्यतीचा माहोल दिसतो आहे. सुजल जगदाळे नेमका कोण ? कोणत्या गावातला हा व्हिडीओ आहे ? याबाबत कोणतीही माहिती सध्या उपलब्ध झाली नसली तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र लोकंचे चांगले मनोरंजन करीत आहे.

सुजल जगदाळे नामक एका विद्यार्थ्याला बैलगाडा शर्यत पाहायची आहे म्हणून तो शैर्यतीच्या ठिकाणी येऊन बसला आहे. शर्यत पाहण्यासाठी हा विद्यार्थी पेपर सोडून आला असल्याने शिक्षक देखील त्याला शोधण्यासाठी शर्यतीच्या ठिकाणी येतात मात्र गर्दीमुळे त्यांना तो काही दिसत नसल्यामुळे त्यांनी थेट आयोजकांकडे रीतसर घोषणा करण्यास सांगितले. त्यामुळे ज्या पद्धतीने ही घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!