सोलापूर बाजारसमितीत लिंबूच्या दराने मोडला मागच्या 10 वर्षांचा रेकॉर्ड ; मात्र शेतकऱ्यांना फायदा नाहीच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना अनुभवायला मिळत आहे. अनेक पिकांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. सध्याचे बाजारभाव पाहता कलिंगड आणि लिंबूला चांगला दर मिळतो आहे. यंदाच्या वर्षी उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. तापमान ४० अंशांपर्यंत पोहचले आहे. अशात सर्वसामान्य नागरिकांचे पेय म्हणून लिंबू सरबत ला मोठी मागणी असते. लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. लिंबूच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबूला दर प्रति किलो २५० रुपये दर मिळाला आहे. मागच्या १० वर्षांमध्ये असे झाले नव्हते. लिंबूला सोलापूर बाजार समितीत रेकॉर्डब्रेक किंमत मिळाली आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे .

शेतकऱ्यांना फायदा नाहीच

सध्या लिंबूला चांगला दर मिळत असला तरी केवळ काही शेतकऱ्यांचाच यामुळे फायदा होत आहे. कारण उत्पदनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना या दराचा फायदा होत नाहीये. यंदाच्या अवकाळी पावसामुळे लिंबूच्या बागांना मोठा फटका बसला. बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ देखील झाली. परिणामी लिंबूच्या उत्पादनात घट झाली आहे. आता मागणी जास्त अन दरही जास्त असला तरी त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाहीये.

सोलापूर बाजारसमितीत लिंबाला मिळतोय चांगला दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिंबाची मागणी वाढली असताना आवक घटली आहे. त्यामुळे लिंबाचा भाव प्रचंड वाढला आहे. बाजारात स्थानिक शेतकऱ्यांनी ३७ क्विंटल लिंबू विक्रीसाठी आणला असता प्रतिक्विंटल लिंबाचा दर किमान ८ हजार रुपये आणि कमाल दर तब्बल २० हजार रुपये मिळाला. सरासरी दर १५ हजार रुपयांपर्यंत गेला. बाजारात लिंबाचा प्रतिकिलो दर सरासरी २५० रुपये असून एक लिंबू १० ते १५ रुपयांस विकले जात आहे.

दरात आणखी वाढ होण्याची शक्यता

सध्याचे लिंबाचे दर हे जास्त आहेतच शिवाय यापुढेही मागणी वाढली आणि त्या तुलनेत आवक कमी असेल तर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता जनकारांकडून व्यक्त केली जात आहे. मागील खरिपात मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी लिंबू , कलिंगड सारख्या मालामुळे का होईन शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

लिंबू बाजारभाव

07/04/2022
कोल्हापूरक्विंटल133500110007250
जळगावक्विंटल117000130009000
पुणे-मांजरीक्विंटल156000120009000
औरंगाबादक्विंटल20120001600014000
चंद्रपूर – गंजवडक्विंटल38000100009000
श्रीरामपूरक्विंटल5100001200011000
राहताक्विंटल5100001700013500
नाशिकहायब्रीडक्विंटल30400090008000
उस्मानाबादकागदीक्विंटल665001350010000
सोलापूरलोकलक्विंटल3780002000015000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल10500070006000
पुणेलोकलक्विंटल168100080004500
पुणे-मोशीलोकलक्विंटल15120001500013500
मुंबईलोकलक्विंटल555500080006500
भुसावळलोकलक्विंटल11250012500

Leave a Comment

error: Content is protected !!