विटा शिवारामध्ये बिबट्याचा वावर ? शेतकऱ्याने बिबट्या पाहिल्याचा केला दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता.प्रतिनिधी

पाथरी तालुक्यातील विटा (बु ) शिवारामध्ये एका शेतकऱ्याला बिबट्या दिसल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरीक व शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

पाथरी तालुक्यातील दक्षिण भागामध्ये गोदावरी नदीकिनारी असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन शेतकरी घेतात. लपण्यासाठी उसाच्या फडाचा आधार तर बंधाऱ्यामुळे मुबलक पाणी साठा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वन्यजीवांचा वावर आहे.

त्यातच शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील वाणीसंगम येथील रहिवासी शेतकरी उमेश पायघन हे विटा शिवारात असणाऱ्या शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना शेताच्या बांधावर बिबट्या झोपलेल्या अवस्थेत दिसला दरम्यान उमेश पायघन यांची चाहूल लागतात सदरील बिबट्या उठून उसाच्या फडात निघून गेला.

यावेळी सदरील शेतकऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली होती अशी माहिती त्यांनी गावातील नागरिक व शेतकऱ्यांना दिली . त्यानंतर ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून परिसरातील सर्वच गावांमध्ये पोहोचले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतात जाणारे शेतमजूर व शेतकरी दहशतीखाली आले असून यासंदर्भात सत्यता पडताळून वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थातून होत आहे.

error: Content is protected !!