बांगलादेश प्रमाणे भारतानेही आयात कर लावावा – बच्चू कडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून भारत सरकारने देशात आयात कर लागू करावेत अशी मागणी केली आहे. सध्या देशात केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात तापलेले वातावरण आहे. अशामध्येच बच्चू कडू यांनी आयात कराची मागणी करत सरकारवर टीकाही केली आहे. त्यांनी सरकार कोणासाठी काम करते आहे ते स्पष्ट लक्षात येते आहे असे म्हणत बांगलादेशला जे जमले ते भारताला का नाही? असा प्रश्न देखील विचारला आहे.
“मागील महिन्यापासून भारताने निर्यातबंदी मागे घेतली. यामुळे बांगलादेशात लाल कांद्याची आयात सुरू झाली. परंतु तेथील शेतकर्चेऱ्यांचे नुकसान होउ नये म्हणुन, बांगलादेशने कांद्यावर दहा टक्के आयातकर लावला. यामुळे आयातीत कांद्याचे सौदे तोट्यात गेले. आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्याकडे वरील प्रकारे आयातकर लावुन स्थानीक शेतकऱ्यांना होणार्‍या नुकसानापासुन वाचवावे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

“निर्यातबंदी व आयातीस मोकळे रान उपलब्ध करून देणार्‍या धोरणांचा आम्ही सक्रीयपणे विरोध करणार आहोत.” असेही ते म्हणाले आहेत तसेच “एकीकडे शेतकरी हिताचे तिन कायदे आहेत, शेतीमालास भाव मिळेल असे सांगणारे आयात धोरणावर का गप्प बसलेले आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बच्चू कडू यांच्या या ट्विटर वर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!