वाह रे पठठ्या ! हिमाचल प्रदेश प्रमाणे चक्क नाशकात फुलवली सफरचंदाची बाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सफरचंद म्हंटल की साहजिकच आपल्याला हिमाचल प्रदेश आणि सिमला अशी स्थळ आठवतात मात्र नाशिक मधल्या एका २५ वर्षीय तरुणाने नाशिकमध्ये सफरचंदाची बाग फुलवली आहे. सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथील चंद्रकांत पंढरीनाथ ह्याळीज या तरुणाने द्राक्ष व डाळिंब शेतातील अनुभवाच्या जोरावर थेट सफरचंद लागवड आणि उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या सफरचंदाला आता मोठ्या प्रमाणात फळे लागली असून रंग चव आकार आणि सरासरी उत्पादन ही हिमाचल प्रदेश काश्मीर प्रमाणात बागलाण मधील लागवडीबाबत ही सर्वच गोष्टी अनुकूल ठरल्या आहेत.

ऑनलाईन पद्धतीने सफरचंद लागवडीची माहिती घेतली

आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर वडील आणि आईसोबत शेती करणाऱ्या चंद्रकांत न प्रारंभी ऑनलाईन पद्धतीने सफरचंद लागवडीची माहिती घेतली आणि त्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी हिमाचल प्रदेशातील बिलासपुर गाठलं या ठिकाणी नर्सरी चालक व शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन माहिती घेतली तेथून तीस रुपये आणून ती आपल्या शेतात लावली डाळिंब आणि सफरचंदाच्या उत्पादनात बरेच साम्य असल्याने चंद्रकांत दोन वर्ष व्यवस्थित लक्ष देऊन योग्य निगा घेतली आता तिसऱ्या वर्षी उत्पादन निघू लागले आहे.

जैविक औषधांचा वापर

डाळिंब प्रमाणे छाटणी करून डिसेंबर मध्ये बहार येतो. अर्थात डाळिंबाच्या तुलनेत खतं आणि फवारणी कमी लागते. फक्त हिमाचल प्रदेश व काश्मीर परिसरात उत्पादित होणाऱ्या औषधांचा परिसरात तुटवडा जाणवतो. त्यावरही मात करत चंद्रकांतने औषधांमधील विशिष्ट कंटेंट लक्षात घेऊन स्थानिक बाजारातील जैविक औषधांचा वापर केला तो देखील यशस्वी ठरला.

हिमाचलच्या शेतकऱ्यांनीही थोपटली पाठ

एच आर एम एन 199 जातीची लागवड त्याने केली असून अतिशय रवाळ असलेल्या या फळाचा आकार मात्र आमच्याही तुलनेत चांगला असल्याचे सांगून हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीर मधील सहकाऱ्यांनी चंद्रकांत ला शाबासकीची थाप दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!