अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि भूस्खलन झाल्यास काय काळजी घ्याल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात सध्या पावसाने आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. कोल्हापूर , सातारा, चिपळूण, रायगड, मुंबई, येथे पूरपरिस्थिती निर्मण झाली आहे. अशावेळेला कोणती काळजी घ्यावी ? काय करावे आणि काय करू नये याबाबतची माहिती करून घेऊया…

पूर किंवा अतिवृष्टी

जर तुमच्या आजूबाजूच्या भागात जर पूर आला असेल तर…
• माहितीसाठी रेडिओ किंवा टीव्ही ऐका.
• अतिवृष्टीमुळे पूर येऊ शकतो हे लक्षात ठेवा. पावसामुळे पूर येण्याची शक्यता असल्यास उंचावर जाऊन थांबा. त्यासाठी कोणाच्याही सूचनेची वाट पाहू नका.
• प्रवाह, ड्रेनेज चॅनेल, कॅन्यन आणि पूराचा धोका असणाऱ्या प्रदेशांमध्ये सावधान राहा. अशा भागांमध्ये कोणत्याही पुर्व इशाऱ्याशिवाय पूर येऊ शकतो.

तुम्ही घराबाहेर पडण्याची तयारी करत असाल तर…
• आपले घर सुरक्षित ठेवा. हातात वेळ असेल तर बाहेरचे फर्निचर आत आणून ठेवा. महत्त्वाच्या वस्तू वरच्या मजल्यावर हलवा.
• तुम्हाला सूचना मिळाली असेल तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मुख्य स्विचेस आणि वॉल्व बंद करा. सर्व विद्युत उपकरणे बंद करुन ठेवा. तुम्ही पाण्यात असाल किंवा ओले झाले असाल तर विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका.

घर सोडणे आवश्यक असल्यास, या गोष्टी लक्षात ठेवा…
• वाहत्या पाण्यात चालू नका. प्रवाहाची सहा इंचापेक्षा जास्त असेल तर तुमचा तोल जाऊ शकतो. प्रवाही नसणाऱ्या पाण्यात तुम्ही चालू शकता. जमिनीवर पाय घट्ट ठेवण्यासाठी जमिनीची तपासणी करण्यासाठी एखादी काठी सोबत ठेवा.
• पूर आलेल्या भागांमध्ये जाऊ नका. जर आपली गाडी पाण्याखाली जायची असेल तर ती तशीच राहू द्या आणि तुम्ही सुरक्षित स्थळी धाव घ्या. पाण्याच्या प्रवाहात तुम्ही आणि तुमचे वाहन वेगाने वाहून जाऊ शकते.

प्रत्यक्ष पूरस्थिती उद्भवल्यास…
1. सरकारी आज्ञेचे पालन करा आणि अधिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.
2. सुरक्षित ठिकाणी रहा आणि योग्य ती माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा.
3. विद्युत पुरवठा बंद करा आणि उघड्या तारांना स्पर्श करु नका.
4. अफवांमुळे घाबरुन जाऊ नका आणि स्वतः अफवा पसरवू नका.

हे करा..
1. विद्युत आणि गॅस उपकरणे व मुख्य स्विचेस बंद करा.

2. आपात्कालीन किट सोबत ठेवा आणि तुमचे मित्र आणि कुटुंबीयांना तुम्ही कोठे जात आहात हे कळवा.
3. पूराच्या पाण्याशी संपर्क टाळा. हे पाणी मल, तेल, रसायने किंवा इतर पदार्थांमुळे दूषित असू शकते.
4. तुम्हाला जर पाण्यात उभे राहायचे असेल तर खांब किंवा काठीचा वापर करा. पाण्याची खोली तसेच ड्रेनेजचे खड्डे आणि नाले तपासा.
5. विजेच्या तारांपासून लांब रहा कारण पाणी हे विद्युतप्रवाहाचे वाहक आहे. वीज कंपन्यांकडे खाली पडलेल्या विजेच्या तारांविषयी तक्रार करा.
6. पूराचे पाणी ओसरलेल्या जमिनीवरुन चालताना काळजी घ्या. ढिगाऱ्याखालील जमिनी व फरशांवर फुटलेल्या काचा, अणकुचीदार वस्तू, खिळे इत्यादी वस्तू असू शकतात. चिखल आणि गाळ साचलेल्या जमिनीवरुन पाय घसरण्याची भीती असते.
7. अद्ययावत माहिती व बातम्या मिळविण्यासाठी रेडिओ किंवा टेलिव्हिजन ऐका.
8. इमारतीचे छत ओले झाले असेल तर वीज बंद करा. जिथून पाणी गळत असेल तेथे खाली बादली ठेवा आणि छताला लहानसे छिद्र पाडा जेणेकरुन त्यावरील भार थोडा कमी होईल.
9. खोलीतील पाणी काढून टाकण्यासाठी बादल्या, स्वच्छ टॉवेल्स आणि कपड्यांचा वापर करा.
10. फर्निचर आणि ओल्या कार्पेटमध्ये अॅल्युमिनियम फॉइल शीट ठेवा.

हे करु नका…
1. वाहत्या पाण्यातून चालू नका. त्यामुळे तुमचा पाय घसरण्याची भीती आहे.
2. वाहत्या पाण्यामध्ये पोहू नका. यादरम्यान वाहून जाण्याची किंवा एखाद्या वस्तूला धडकण्याची दाट शक्यता असते.
3. पूरग्रस्त भागातून वाहने नेऊ नका. तुम्हाला त्या परिसरातील अडथळ्यांचा अंदाज येणार नाही. तसेच अवघ्या अर्धा मीटर पाण्यात वाहने वाहून जाण्याची दाट शक्यता असते. तसेच पूरग्रस्त भागातून वाहने चालवताना आजूबाजूच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.
4. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले कोणतेही अन्न खाऊ नका.
5. अभियंताने तपासणी केल्याशिवाय वीजेचा वापर सुरु करु नका. गॅस गळतीबाबत सावध रहा. मेणबत्त्या, कंदील किंवा कसलीही ज्योत पेटवू नका.
6. वस्तूंवरील चिखल घासण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे मालमत्तेचे आणखी नुकसान होऊ शकते.
7. छत ओले असताना त्याला जोडलेली उपकरणे वापरु नका.
8. ओल्या फरशीवर उभे राहून टीव्ही, व्हीसीआर, सीआरटी टर्मिनल्स किंवा इतर इलेक्ट्रीकल उपकरण सुरु करु नका.
9. व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करून साचलेले पाणी काढण्याचा प्रयत्न करू नका.
10. तळघरातील पाणी बाहेर काढण्याची घाई करु नका. गरजेपेक्षा अधिक कमी वेळात पाण्याचा दबाव कमी झाला तर भिंतींवर ताण वाढू शकतो.

भूस्खलन

हे करा…
• हवामान विभाग किंवा न्यूज चॅनेलवर माहिती पाहून डोंगराळ प्रदेशात दौरा आखा.
•वेळ न दवडता भूस्खलन मार्गावरुन किंवा दऱ्यांपासून लांब जा.
• गटारे स्वच्छ ठेवा,
• कचरा, पाने, प्लॅस्टिकची पिशव्या, मलबा इत्यादीचा निचरा झाला आहे याची तपासणी करा.
• ‘वीप होल्स’ उघडे ठेवा.
• भरपूर झाडे लावा जेणेकरुन ते मातीला मूळापासून घट्ट धरुन ठेवतील.
• भूस्खलनाचा इशारा देणाऱ्या प्रदेशातील दगड कोसळलेल्या, खचलेल्या इमारतींची तपासणी करा आणि सुरक्षित स्थळी धाव घ्या. नदीतील गढूळ पाण्यावरुनदेखील वरच्या भागात भूस्खलन झाल्याचा अंदाज येऊ शकतो.
• भूस्खलनाच्या सूचनांकडे लक्षा द्या आणि जवळच्या तहसील किंवा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधा.
• जमिनीच्या उतारांची टोके कापलेली नाहीत आणि सुरक्षित आहेत याची खात्री करा. जोपर्यंत नवी झाडे लावण्याची योजना केली जात नाही तोपर्यंत जुनी झाडे कापू नका.
• झाडांची पडझड किंवा खडक कोसळण्याच्या अनैसर्गिक आवाजांकडे लक्ष द्या.
• भूस्खलनाचा परिणाम होण्याची शक्यता असल्यास दक्ष, जागृत आणि सक्रिय राहा.
• योग्य आश्रयस्थान शोधा
• आपल्या कुटुंब आणि मित्र मैत्रिणींसोबत राहण्याचा प्रयत्न करा.
• जखमी आणि अडकलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करा.
• तुम्ही जात आहात तो मार्ग लक्षात ठेवा जेणेकरुन तुम्ही जंगलात हरवणार नाही.
• हेलिकॉप्टर व बचाव पथकांना आपत्कालीन वेळ दरम्यान संकेत कसे द्यायचे आणि कशा प्रकारे संवाद साधावे हे जाणून घ्या. हे करु नका..
• बांधकाम सुरु असणाऱ्या किंवा संवेदनशील भागात राहण्याचे टाळा.
• रडून किंवा घाबरुन तुमची ऊर्जा खर्च करु नका.
• उघड्यावरील वस्तू किंवा सूटलेल्या विद्युत तारांना स्पर्श करु नका. जवळच्या ढिगाऱ्याजवळ आणि ड्रेनेज मार्गाजवळील घरे बांधू नका.
• झरे, विहिरी किंवा नद्यांचे दूषित झालेले पाणी थेट पिऊ नका.
• मोठा धोका असल्याशिवाय जखमी व्यक्तींना प्रथमोपचार न करता हलवू नका.

संदर्भ – आपत्ती व्यवस्थापन कक्ष पुणे महापालिका

Leave a Comment

error: Content is protected !!