केंद्राने सोयाबीन आयात केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान: राज्यमंत्री बच्चू कडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला आहे तसेच सोयाबीनच्या दरातही कमालीची घट झाल्याचे पहायला मिळते आहे. अशातच सोयाबीनच्या प्रश्नाबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर प्रहार केला आहे. केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीनच्या दरात घसरण झाली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकावर हल्ला केला आहे. जुलै -आगस्ट मध्ये साधारणपणे १० हजार प्रती क्विंटल सोयाबीनचा दर होता, मात्र आता त्यात मोठी घसरण होऊन शेतकऱ्याचे सोयाबीन बाजार येण्याआधी सोयाबीन प्रती क्विंटल ४५०० ते ५००० दर झाला. केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप राज्यमंत्री बच्चू कडून अमरावतीत यांनी केला आहे. सोयाबीन आयात करुन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालवली याचा निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आयातीचे धोरण स्वीकारले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा होऊ शकतात असा इशाराही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!