आंब्याच्या बागेत व्यापाऱ्यांनी ठरवला दर , 10 दिवसांवर होती तोडणी ; पण अवकाळीने केला शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

शेतकरी रात्र -दिवस एक करून आपल्या शेतात कष्ट घेत असतो . आपल्या पिकांची तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेत असतो. मात्र मागील काही दिवसांपासून लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे. अशीच घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे.


माण तालुक्यात मध्यरात्री अवकाळी वादीळवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पळसावडे , देवापूर , शिरताव , वरकुटे – मलवडी परिसरात रात्री १० घ्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व गारपीठासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या वादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली. व देवापूर येथील आंबा बागायतदार कृष्णराव रघूनाथ बाबर यांची एक एकर आंबा रात्रीच्या अवकाळी पावसात भुईसपाट झाली आहे .

कृष्णराव बाबर यांची आंबा बागेत कालच व्यापारी येऊन गेले होते. १४० रु. दराने संपूर्ण बागे ठरविण्यात आली होती. ८ ते १० दिवसांत बाग उतरायची होती. अंदाजे १२ ते १३ टन माल अपेक्षित होता. कृष्णराव बाबर यांचे १४ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवसभर पाऊसाचे वातावरण दिसत होते. त्यातच सूरुवातीला रात्री १० वा. वादळाला सुरूवात झाली. बघता बघता विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडला.या मुसळधार पावसामुळे या परिसरातील आंबा , द्राक्ष , नारळ बांगासह दोडका , कारले , टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाच्या दणक्यानेआंबा , द्राक्ष , नारळ बागायतदार पुर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या अवकाळी पावसाचा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.आंबा , द्राक्ष ,नारळ पिकांचे नुकसान झाल्याची कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी.
अजून दोन दिवस अवकाळी पावसाचे संकट असण्याची शक्यता आहे. अशा अवकाळी पावसाने आंबा द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. पुढील दोन चार दिवसांत पावसाची वाढ अपेक्षित आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

कर्जमाफीच्या आनंदावर पाणी
सध्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. अशातच देवापूर पळसावडे भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे, फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या आनंदावर अवकाळी पावसाने पाणी फिरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.या भागांत अवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली फळ, पिके तर हिरावली गेलीच आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!