Magel Tyala Shettale : राज्यात 6 हजार 72 शेततळी पूर्ण; अर्ज करण्याचे सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ (Magel Tyala Shettale) योजना राबवली जात आहे. यामध्ये आतापर्यंत राज्यातील 23 हजार 524 शेततळ्यांना तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्व संमती दिली असून, त्यामधील 6 हजार 72 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी 41 कोटी 60 लाख रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाकडून (Magel Tyala Shettale) देण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींतून येणारे नैराश्य दूर व्हावे. या अनुषंगाने कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे मिळणारे विविध घटकांचे लाभ मागणी केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतात. यामध्येच ‘मागेल त्याला शेततळे’ (Magel Tyala Shettale) या घटकांतर्गत राज्यात 6 हजार 72 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. या योजनेसाठीचा निधी शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आला आहे. सोडत पद्धत रद्द केल्यानंतर ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. तेव्हापासून आतापर्यंत या नवीन 23 हजार शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

पूर्ण झालेल्या शेततळ्यांची आकडेवारी (Magel Tyala Shettale Scheme)

  • कोकण विभाग – 149.
  • नाशिक विभाग – 1070.
  • पुणे विभाग 2907.
  • कोल्हापूर विभाग – 708.
  • छत्रपती संभाजीनगर विभाग – 474.
  • लातूर विभाग – 290.
  • अमरावती विभाग – 187.
  • नागपूर विभाग – 287.

कुठे आणि कसा कराल अर्ज?

दरम्यान, अद्यापही राज्यातील ज्या शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अर्ज करायचे आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज कसा करायचा? शेततळ्यासाठीचे अनुदान कसे मिळवायचे? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? याबाबतची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकता.

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी असा करा अर्ज; वाचा संपूर्ण माहिती? (https://hellokrushi.com/agriculture-schemes-magel-tyala-shettale-farmers/)

error: Content is protected !!