‘महाबीज’ने पुरेसा बियाणे पुरवठा करावा : मंत्री नवाब मलिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रातील संभाव्य वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीज बियाणे उत्पादक कंपन्यांकडून पाठपुरावा करावा. असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित खरीप हंगाम पूर्वनियोजन  आढावा बैठकीमध्ये मलिक बोलत होते.

यावेळी बोलताना मलिक म्हणाले की,गत वर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे निकृष्ट बियाणे उगवल्यानंतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांकडून तक्रार केलेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई देणे आवश्यक होतं. परंतु अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. हे त्या खरिपासाठी शेतकऱ्यांना बियाणे खते आदी निविष्ठा पुरेशा प्रमाणात तसेच वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात. मध्यप्रदेशातून सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत असतील तर महाबीज न सोयाबीनच्या बियाणांची गरज लक्षात घेऊन अन्य राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांकडे बियाणे उपलब्धतेसाठी पाठपुरावा करावा. बँकांनी पीक कर्ज वाटप सुरू करावे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे असे मलिक यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: Content is protected !!